गोफण | पॉवरफुल काका देतील मुक्तीचा मार्ग...

Gofan Sakal
Gofan Sakalesakal

देश चंद्रावर पोहोचला अन् सगळीकडे जल्लोष सुरु झाला... दोन महिन्यांपूर्वी काकांचं बोट सोडून विश्वगुरुंच्या भक्तीत तल्लीन झालेल्या दादाराव दणगटेंनी सगळ्यांना एक पार्टी द्यायचं ठरवलं. 'पार्टी तो बनती हैं' या दुहेरी अर्थाच्या टॅगलाईनखाली त्यांनी खास मेजवाणीचा बेत आखला होता.

दादाराव सत्तेच्या दरबारात उप-दर्जाच्या पदावर होते. पण डोळा मुख्य दर्जाच्या पदावर होता. मुख्य दर्जाच्या पदावर असलेल्या नाथबापूंनी मागे बोलावलेल्या जेवणावळीला दादाराव गेलेले नव्हते. आपल्या वकुबाला आणि पर्यायाने त्याच पदावर जाण्याच्या मनसुब्यांना तडा जावू नये म्हणून त्यांनी ती सामान्य मंत्रिगणांसाठी बोलावलेली पार्टी खुबीने टाळली होती. त्यामुळे दादारावांनी चालाखी साधत नाथबापूंना आवतन धाडलं नव्हतं.

त्यांच्याऐवजी मातब्बर-श्री गडाचे राजे उधारराजे डरकाळे यांना त्यांनी निमंत्रण धाडलं. उधारराजेंनी पुन्हा-पुन्हा खात्री केली की, मागच्या वर्षी गडाच्या मागच्या दाराने पळून गेलेले नाथबापू तर मेजवाणीसाठी येणार नाहीत ना? दादारावांनी शेवटी ठणकावून सांगितलं, ''पाह्यजेल तर बाँडवर लिहून देतो.. पर असा गैरइस्वाक दाखवू नगा'' त्यावर उधारराजेंना खरंतर हसायचं होतं. पण त्यांनी स्वतःला सावरलं.

त्याचं कारण मागे त्यांनी एका बातमीदारावर डाफरत ''विश्वगुरुंचं तोंड बघणार नाही.. हवं तर बाँडवर लिहून देऊ का?'' असा दम भरला होता. हा इतिहास इ.स. पूर्व दोन-अडीच महिन्यांपूर्वीचा असेल. त्यानंतर त्यांनी दिल्ली दरबारात खणखणीत मुजरा घातला होता. त्यामुळे विश्वास, बाँड आणि दादाराव तीनही विरुद्धार्थी शब्द आहेत, हे तमाम रयतेला ठावूक आहे. फक्त शाळेत शिकवायचं राहिलं होतं. तरीही दादारावांपुढे बोलणार कोण? म्हणून सगळे गुप्तपणे चर्चा करीत.

उशीर व्हायला नको म्हणून दादारावांच्या पार्टीला उधारराजे अन् इतरही पुढारी हजर झाले. यजमान असल्याने त्यांनी प्रस्तावना सुरु केली. चुकायला नको म्हणून कागद लिहून आणला होता. ''आज या ठिकाणी राजकारण करत असताना, समाजकारण करत असताना आपल्या देशाला मोठं यश मिळालं आहे. चंद्रकांत ३ हे विमान चंद्र नावाच्या देशावर पोहोचलं आहे. हे फक्त केवळ विश्वगुरुच करु शकतात. आमच्या लहानपणी आम्ही चंद्रकांता ही मालिका बघायचो. साहेबांनी आम्हाला ही मालिका बघायला शिकवलं होतं. परंतु विश्वगुरुंनी मालिकेतल्या पात्रांना एकत्रित करुन त्यांना उडायला शिकवलं.. ही मोठी अॅSचिव्हमेंट म्हणावी लागेल, आज या ठिकाणी...''

मध्येच कुणीतरी जोरात टाळ्या वाजवल्या. पाठोपाठ सगळ्यांनीच टाळ्यांचा कडकडाट केला. ज्याने सुरुवातीला टाळ्या वाजवल्या त्याच्या तोंडातून जोराची हवा बाहेर पडणार होती, ती रोखून त्याने आधी टाळ्या वाजवल्या मग कोपऱ्यात जावून तोंडातली हवा आणि घशातून आवाज काढला. सामान्यपणे या क्रियेला हसणं म्हणतात.

त्यानंतर उधारराजे बोलू लागले- ''आम्हीही कधीतरी लहान होतो..होतोच! आम्हीही चंद्रकांता मालिका बघितली. ती मालिका बनवण्याची प्रेरणा कुणाची होती? (लोचट मजनू स्टाईलमध्ये) कुणाची होती? अूं..सांगा ना? हं.. कुणाची होती? कुणाची तरी होतीच ना? त्यात नमोभाईंना श्रेय देण्याचा 'घाट' कशासाठी? चंद्रावर तरी आहेत का घाट? नुसते खड्डे आहेत.. इथं आंबोली घाटातले रस्ते धड करता येईनात अन् निघाले चंद्रावर. त्या मालिकेतल्या सगळ्या कलाकारांचं कौतुक व्हायला पाहिजे.. पण श्रेय घेतंय कोण? सांगा ना..अूं-''

उधारराजेंना मध्येच थांबवत कोट घातलेल्या एका कोकणी पुढाऱ्याने दंगा सुरु केला. ''इथं आंबोली घाटाचा काय संबंध? आमच्या इलाख्यातल्या घाटबद्दल कुणी बोललं तर याद राखा. तुम्ही मच्छर तरी मारलाय का? आमच्या विश्वगुरुंनी चंद्रावर जाऊन दुसरा एअर स्ट्राईक केलाय... काही कौतुक-ब्युतूक आहे का नाही? इट इज व्हेरी पावरफेल मिशन इन धीस कंट्री अँड स्टॉप कॅनट्राव्हर्शिल स्टेटमेंट..कळलं का?''

नरहरी राणबोके तिथं आहेत हे उधारराजेंना ठाऊक नव्हतं. दोघांनी एकमेकांकडे कटाक्ष टाकला.. तसेच दोघे समोरासमोर आले..हमरीतुमरी सुरु होणार होती. दादाराव दणगटे बाजूला उभा राहून मजा बघत होते.. त्यांनी शेजारी उभ्या असलेल्या एकाला डोळादेखील मारुन झाला होता. परिस्थिती हाताबाहेर जाईल म्हणून शेवटी दादारावांनी नंतर मध्यस्थी केली अन् दोघांना विरुद्ध दिशेला लोटलं.

आता न बोलावताही तिथं एक हस्ती हजर झालीय. सोबतीच्या एकाने जोरदार आरोळी ठोकली, ''मंत्रिगणं.S प्रमुखंSS..राज्यकार्य कुशलS सर्वमान्य-सर्वसामान्य सरकारं.. प्रमुखSS श्री-श्री नाथबापू एकशिंगे पधार रहें हैं...'' अन् तिकडून दाढी कुरवाळत डोक्यावर छत्र घेऊन, जरीपटका मिरवत नाथबापू पधारले. कुणीही बोलावलं नव्हतं तरीही ते आल्याने सगळ्यांनीच नाकं मुरडली.

कुणीही बोला म्हटलं नाही, तरी नाथबापू बोलते झाले- ''आज या ठिकाणी येऊन मला अतिशय आनंद झाला... कुणाची कधी-केव्हा गरज पडेल सांगता येत नाही. परिस्थिती आणीबाणीची आहे. सगळे आपलेच आहेत. शेवटी जुनं ते सोनं असतं. माणसाने लै चंद्रावर झेपा घेतल्या तरी त्याचे पाय जमिनीवरच पाहिजेत. आज या ठिकाणी मी चंद्रकांता मालिकेतील सगळ्या कलाकारांचं कौतुक करतो. देशाच्या मानात खुपसलेला शिरतुरा-''

भाषण सुरुच राहिलं अन् सगळे निघून गेले. नाथबापू एवढ्या वेळ बोलत होते की त्यांचे कोरड्या नजरेचे बाऊन्सर्ससुद्धा पेंगुळले होते. भाषण संपलं अन् नाथबापू पुन्हा दाढी कुरवाळत पॉवरफुल काकांकडे निघाले. एकटेपणाच्या या संकटातून मुक्तीचा मार्ग तेच दाखवतील, हे त्यांना कळून चुकलं होतं...

'गोफण'चे मागील सर्व भाग वाचण्यासाठी खाली लिंक्स दिल्या आहेत

Gofan Sakal
गोफण| थू..थूS..थूSS...!
Gofan Sakal
गोफण | पराभव जिव्हारी लागला अन् मोटाभाई दिल्लीकडे निघाले...
Gofan Sakal
गोफण| फडतूस नहीं काडतूस!
Gofan Sakal
गोफण | 'काळा चष्मा घातल्यावर पित्त वाढत नस्तंय'
Gofan Sakal
गोफण| तुमची 'केरळ स्टोरी' वेगळी आमची वेगळी...
Gofan Sakal
गोफण | एका दगडात पक्षी तरी किती मारावेत
Gofan Sakal
Gofan | बोलभांडे रौतांची 'ती' खेळी उधार राजेंना कळली तेव्हा...
Gofan Sakal
गोफण| ऐका हो ऐकाSS.. कोण जास्त लोकप्रिय?
Gofan Sakal
गोफण | मम्मी मेरी शादी कर दो Gofan
Gofan Sakal
गोफण | गुगलीने घेतली विकेट!
Gofan Sakal
प्रश्न वयाचा नाही...हिंदुत्वाचा आहे! Gofan
Gofan Sakal
गोफण | बंद दाराआडची गुपितं
Gofan Sakal
गोफण | जंगलाचाही एक कायदा असतो, पण इथे...
Gofan Sakal
गोफण| गद्दार, खोके, लाचार, खंजीर... अन् मुलाखत संपली!
Gofan Sakal
गोफण| नमोभाईंची 'ही' खेळी दादारावांना पटली नाही
Gofan Sakal
गोफण| काका चिडले पण नमोभाईंपुढे करणार काय?
Gofan Sakal
गोफण | त्यागमूर्ती... वैराग्यमूर्ती प्रतोदशेठ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com