गोफण | दादारावांचा आदर्शवादी अशोकचंदांना सल्ला

स्वातंत्र्यपूर्व काळात देशात सत्याग्रह चळवळ चालली होती म्हणे. आज स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीनंतर 'सत्ताग्रहण' चळवळ सुरु झालीय. याच चळवळीत आणखी एका छोटुशा संस्थानचे छोटुशे राजे सामील होणार होते. मराठवाडाप्रांताच्या नांदगडचे आदर्शवादी संस्थानिक अशोकचंद खुशाले सत्ताग्रहण करणार होते.
Gofan Article
Gofan Articleesakal

'उनाळा लागला तरी पहाटचा गारवा कसंकाय संपना?' या समस्येवर दादाराव दणगटेंनी विषय लांबवला होता. वाड्यातली अनौपचारिक बैठक रंगली होती. पुढ्यात बसलेले होना..होना.. करुन दाद देत होते. भावकीची मालमत्ता ताब्यात घेतल्यापासून दादारावांच्या चेहऱ्यावर जे जिंकल्याचे भाव होते, ते जाता जात नव्हते. तेवढ्यात एक संस्थानिक लगबग करत वाड्याच्या दिशेने येताना दिसले. त्यांच्या चालण्याची ढब बघता ते मागच्या कित्येक वर्षात एवढ्या वेगात चालले नव्हते, असं भासत होतं.

दादारावांनी तिकडे एक नजर टाकली अन् गालातल्या गालात मिश्किलपणे हसले. तसे ते संस्थानिक दादारावांच्या बैठकीत आले. दोघांनी एकमेकांना रामराम घातला. संस्थानिकाच्या चेहऱ्यावरची चलबिचल बघता दादारावांनी पुढ्यात बसलेल्या 'श्रोत्यांना' इशारा करत जायला सांगितलं. पडत्या फळाची अपेक्षा करत तेही पटापट उठले, दादारावांच्या पायाला हात लावत त्यांनी बाहेरचा रस्ता धरला.

स्वातंत्र्यपूर्व काळात देशात सत्याग्रह चळवळ चालली होती म्हणे. आज स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीनंतर 'सत्ताग्रहण' चळवळ सुरु झालीय. याच चळवळीत आणखी एका छोटुशा संस्थानचे छोटुशे राजे सामील होणार होते. मराठवाडाप्रांताच्या नांदगडचे आदर्शवादी संस्थानिक अशोकचंद खुशाले सत्ताग्रहण करणार होते.

आदर्शवादी संस्थानिक दादारावांच्या समोर बसले. कपाळावर घामाचे टपोरे थेंब साचले होते, धावत आल्यामुळे दम लागला होता, डोळ्यात चिंता दाटून आली होती.. प्रकृतीत शांतपणा नव्हता. नुसती चुळबुळ सुरु होती. घामाने ओलेते झालेले तळहात रुमालाने कोरडे केले अन् बोलले- ''दादाराव, मी काय म्हनीत होतो-''

दादाराव मध्येच खेकसले. ''तुमी काय म्हनू नका.. हातावर हात ठिवून गप् ऱ्हा निस्ते, आन् जवा गळ्याला ईल तवा पळापळ करा. हिवढी खुशालगिरी नस्ती जमत राजकारणात''

आदर्शवादीः तुमचं खरंय दादाराव, पर जरा आमचंबी आयकुन घ्या की-

दादारावः (दादाराव ऐकून घेण्याच्या तयारीत नव्हते.त्यांना साचलेलं बोलायचं होतं.) वर्ष व्हत आलं वर्ष.. ठरल्यालं. आतापतूर एखाद्-दुसरी जहागिरी मिळाली अस्ती. निस्ता इच्चार-इच्चार-इच्चार.. आरं पर किती दिस?

आदर्शवादीः आजूनबी जीव न्हाईच म्हनतोय.. घरातले-दारातले सगळेच नगं-नगं करायलेत.

दादारावः (चिडून) त्यांचं काय जातंय तवा. जेलात जाताल जेलात.. मंग तरास त्यांना व्हनार का तुमाला?

आदर्शवादीः (गयावया करुन) जेलात नगं जायचं दादाराव.. आमचं ह्यवढं मोठं संस्थान, लहानपणापासून छामजाम.. सगळं कसं खुशालीत झालंय. मंग ह्या वयात जेल?

दादारावः मलाबी असाच इरोध झाल्ता.पर मी इच्चार करीत न्हाई बसलो. ठोक निर्णय घेतला.

आदर्शवादीः आमीबी ठोकच निर्णय घ्येनारेत. तिकडं आमच्या दारात दोन गाड्या उभ्यात. एक पुलिसाची आन् एक फुलानी सजलेला रथ.

दादारावः जा..जा... बसा रथात. इथंच सगळं सुखंय. आमी बगा कसे निवांत-सुखाची झोप घेतोय.

आदर्शवादीः (डोळे पानावले होते, शब्द फुटत नव्हते. तरीही बोलले) आमचं काय?

दादारावः (गोंधळून) काय आमचं काय?

आदर्शवादीः तुमी तुमची सोय करुन घितली.. पर आमचंबी कायतरी बघा.

दादारावः (खळखळून हसत) इथं आमाला पाह्यजेल ते मिळंना.. तुमची उदबत्ती कुठं लावता.

आदर्शवादीः (बारीक तोंड करुन) पर कायतरी पाह्यजेल ना राव. नायतर लोकं काय म्हण्तेल.

दादारावः मिळंल-मिळंल.. तुमी फक्त नवी निष्ठा ढळू देऊ नका..

(बोलणं सुरु असताना दारात सायरन वाजला. आदर्शवादी संस्थानिक अशोकचंद खुशाले जागेवरच उडाले.)

आदर्शवादीः आगा बाबो.. येतो येतोS.. दादारावर येतो. रामराम

दादारावः रामराम नाही जय श्रीराम म्हणा..

आदर्शवादीः बरं..बरं. जय श्रीराम-जय श्रीराम!

समाप्त!

संतोष कानडे

santosh.kanade@esakal.com

Gofan Article
गोफण | गावात कुणी विरोधक आहे का याचा शोध घ्या!
Gofan Article
गोफण | बिहारपुरीच्या पलटू चाचांचा उधारराजेंना फोन
Gofan Article
गोफण | निमंत्रण मिळालं अन् ते खुश झाले...
Gofan Article
गोफण | पॉवरफुल काका देतील मुक्तीचा मार्ग...
Gofan Article
गोफण | काका बारामतीकरांची कुजबुज अन् संभ्रम
Gofan Article
गोफण | पत्रकारांवर बहिष्कार घालणाऱ्यांनी परिषदेत येऊ नये!
Gofan Article
गोफण | टोलधाडीला फोडून काढण्यासाठी राजासाब सज्ज
Gofan Article
गोफण | मी पुन्हा येईन... मग यांनी काय करायचं?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com