

Maharashtra Latest Marathi News Live Update
esakal
पारध : घरात वडील रागावल्याने पारध पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील एका चौदा वर्षीय मुलाने चक्क पलायन करून थेट मुंबई गाठल्याची घटना मंगळवारी (ता. 26) दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. तर, पारध पोलिसांनी वडिलांच्या तक्रारीवरून आज्ञात संशयित आरोपी विरुद्ध पळवून नेल्याचा गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली असता, हा मुलगा मुंबई मुलुंड पोलिस ठाण्यात सुखरूप असल्याचे पोलिसांनी सांगितले.