नृत्यकलाकाराचे खरे कौशल्य

photo
photo

नुकताच म्हणजे २९ एप्रिल हा नृत्यदिन साजरा झाला. या निमित्ताने जगभरात नृत्य-कलेचे सादरीकरण केले जाते. भारतात कश्‍यक, ओडिसी, भरतनाट्यम, मणिपुरी, कुचिपुडी अशा शास्त्रीय नृत्यकला प्राचीन काळापासून प्रचलित आहेत. या कलेचा पाया खोलवर मुळापर्यंत रुजलेला आहे. या कलेचे व्यापक ज्ञान एका पिढीकडून पुढील पिढीपर्यंत पोहाचवण्याचे काम नृत्य कलाकारांनी अविरत खंड पडू न देता सेवेभावे केलेले आहे. त्याचाच परिपाक म्हणून आज नृत्यकला गुरुकुलांच्या माध्यमांतून पाहावयास मिळते.
नृत्य-कलेसाठी स्थानिक भाषा, संस्कृती, नृत्यपरंपरा तसेच रंगभूषा, वेशभूषा यांची ओळख असावी लागते. साहित्य-कला कृतीतील कल्पना प्रत्यक्षात उतरवताना हे उपयोगी पडते. यात मूळ पायाला धक्का न लावता, रंगमंचावर कलेचे सादरीकरण करतांना नृत्यकलाकाराचे खरे कौशल्य पणास लागते.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

त्यासाठी नर्तकाचा अविरत अखंडित सराव महत्त्वाचा असतो. त्यातून आत्मविश्‍वास निर्माण होऊन साहित्य कलाकृतीतील ठसा जशास तसा रसिकांच्या मनावर प्रतिबिंबित होण्यास मदत मिळते. जसे एखादे साहित्य भाषांतर करताना मूळ कलाकृतीत फरक पडणार नाही याची काळजी घ्यावी लागते अगदी तशीच काळजी नृत्यांतून ती कलाकृती सादर करतांना घेतली जाते. त्यामुळेच त्या कलेची परिणामकता वाढत असते. नृत्यकला अधिक-अधिक अकादमींच्या माध्यमांतून तज्ज्ञ नृत्यकलाकारांचे व प्रसिद्ध नृत्य-गुरूंचे मार्गदर्शन मिळण्याची संधी मिळते. यामुळे साहजिकच नुकत्याच नृत्यकलेच्या क्षेत्रांत पदार्पण करीत असलेल्या नर्तकांना त्यांच्यातील उणिवा दूर होऊन त्या सुधारण्याची संधी मिळते. या सततच्या प्रक्रियेतूनच शास्त्रीय नृत्याची ओळख करून देणारे अनेक नामवंत कलाकार निर्माण होतात.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

यामध्ये स्थानिक कलाकारांचा विचार केल्यास येथील (औरंगाबाद) प्रसिद्ध गुरुकूल नृत्यअकादमीने पं. बिरजू महाराज, डॉ. सुनील कोठारी- नृत्याचे अभ्यासक, लीला व्यंकटरमण- नृत्य समीक्षक- इत्यादींचे मौल्यवान मार्गदर्शन उपलब्ध करून दिलेले आहे. नृत्यकलेकडे आजकाल शास्त्रीय दृष्टिकोनातून न बघता कमी वेळेत कला शिकण्याकडे कल दिसून येतो. त्यास बहुतांशी व्यावसायिक स्वरूप होण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. यातून कोणत्याही प्रकारचा सर्वांगीण, सखोल अभ्यास न करता अपूर्ण ज्ञानावर आधारित कला पुढील पिढीपर्यंत जाणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. शास्त्रीय नृत्यकलेकडे मुलींपेक्षा मुले कमी आकर्षित होताना दिसतात. स्त्री भूमिकेतील साहित्य कलाकृती सादर करताना त्यातील स्त्री-सुलभ सहज अभिनय, देहबोलीचे हावभाव दाखविण्याची संधी उपलब्ध असते. श्री शंकरांच्या तांडव नृत्यात पुरुषीपणाला जसे महत्त्व असते तसे राधा-कृष्णाची भूमिका आत्मसात करतांना स्त्री कलाकार सहजपणे नजाकतीने पार पाडू शकतो. ही तफावत नवीन कलाकारांनी अवश्‍य लक्षात घेतली पाहिजे व ती दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एखादी साहित्य कलाकृतीची रचना सादर करावयाची असल्यास त्यासाठी हाताची प्रत्येक हालचाल हवेत हुबेहुब त्या रचनेतील कल्पनेनुसार आकार घेत असते. त्यात भर म्हणजे मंजुळ पदन्यासातील घुंगरांचा आवाज, हळूहळू वाढत जाणारा प्रकाश झोत, नृत्यातील परिणामकारकता वाढवून रसिकांना आनंद मिळवून देतो. हे सर्व सततच्या अभ्यासातून साध्य होऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com