Satej Patil Birthday : जनसामान्यांसाठी अहोरात्र धडपडणारं नेतृत्व म्हणजे 'सतेज पाटील'

जनसामान्यांची कामे पूर्ण करण्यासाठी अहोरात्र धडपडणारे नेतृत्व म्हणून सतेज पाटील यांच्याकडे आश्वासक चेहरा म्हणून पाहावे लागेल.
MLA Satej Patil
MLA Satej Patilesakal
Summary

जिल्हा काँग्रेसचे नेतृत्व करताना प्रत्येक तालुक्यात काँग्रेसचे कार्यकर्ते वाढविण्यामध्ये त्यांनी कसब पणाला लावले.

-प्रा. डॉ. प्रवीण जाधव

Satej Patil Birthday : सत्तेच्या संक्रमण काळात बहुतांशजण भीतीने, अपेक्षेने, आशेने किंवा जबरदस्तीने सत्तेकडे खेचले जात असताना काँग्रेस पक्षाचे विचार सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी दिवस-रात्र कार्यरत असलेले नेतृत्व म्हणजे आमदार सतेज पाटील. आज त्यांचा वाढदिवस...

जनसामान्यांची कामे पूर्ण करण्यासाठी अहोरात्र धडपडणारे नेतृत्व म्हणून सतेज पाटील यांच्याकडे आश्वासक चेहरा म्हणून पाहावे लागेल. २०१४ च्या लोकसभेमध्ये पारंपरिक विरोध संपवून प्रामाणिकपणे मदत केल्यानंतर राजकारणातील नवा धडा शिकून पुन्हा नव्याने उभारी घेतली. लगेचच विधान परिषदेला काँग्रेसची (Congress) आमदारकी जिंकली. २०१४ मध्ये जिल्ह्यातील काँग्रेसचा एकही आमदार निवडून आला नाही. ही गोष्ट त्यांच्या मनाला लागली. त्यानंतर नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आधार देऊन त्यांना उभे करण्याचे काम आमदार सतेज पाटील यांनी केले.

MLA Satej Patil
लोकसभेच्या आखाड्यात संजय पाटलांना मिळणार पडळकरांची मोठी ताकद; जुना कडवा संघर्ष कार्यकर्ते विसरणार?

हे करतानाच जिल्ह्यासोबत जिल्ह्याबाहेरही काँग्रेसचा विस्तार वाढविण्याचे काम त्यांनी सुरूच ठेवले. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभेच्‍या निवडणुकीमध्ये जिल्ह्यातून चार आमदार निवडून आणण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यानंतर शिक्षक मतदारसंघामधूनही काँग्रेसचे जयंत आसगावकर यांना निवडून आणून काँग्रेसचे जाळे भक्कम केले. २०१९ मध्ये झालेल्या सत्तांतरात राज्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेऊन मंत्रिपदाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी घेतलेले अपार कष्ट उल्लेखनीय ठरले. सत्ता गेली तरी कार्यकर्त्यांचे जाळे वाढविण्यात त्यांचे कौशल्य वाढतच गेले.

एखाद्या कार्यकर्त्याला भक्कम आधार द्यावा तर तो आमदार सतेज पाटील यांनीच, असा आशावाद जिल्ह्याबाहेरही वाढत गेला. जिल्हा काँग्रेसचे नेतृत्व करताना प्रत्येक तालुक्यात काँग्रेसचे कार्यकर्ते वाढविण्यामध्ये त्यांनी कसब पणाला लावले. हे व्याप सांभाळताना कोल्हापूर दक्षिणच्या कार्यकर्त्याला आपुलकीची जाणीव देताना ते कधीही मागे पडत नाहीत. काँग्रेस पक्षाची कमान समर्थपणे सांभाळण्यास आमदार सतेज पाटील नक्कीच विश्वासार्ह ठरले आहेत. हे सर्व करताना वडील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी वाढविलेल्या शैक्षणिक समूहाकडे ते लक्ष देत असतात.

MLA Satej Patil
सातारा पुन्हा एकदा इतिहास घडवेल आणि शरद पवारांचा जिल्हा पुन्हा अबाधित राहील; शशिकांत शिंदेंना विश्वास

ज्येष्ठ बंधू डॉ. संजय पाटील यांच्यासोबत त्यांची वाटचाल भक्कम होत आहे. त्यांच्या घराण्याची पुढची पिढी म्हणजे पुतणे आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, पुत्र तेजस पाटील यांना घडविणे तसेच त्यांना चांगले संस्कार देण्यात ते नेहमी सजग असतात. काँग्रेस पक्षाच्या विचार-आचारांवर श्रध्दा ठेवून कार्यकर्त्यांची फळी भक्कम करण्यात मग्न असणाऱ्या आमदार सतेज पाटील यांना वाढदिवसाच्या भविष्यातील वाटचालीस खूप-खूप शुभेच्छा... वेगवेगळ्या समित्यांवरही कार्याचा ठसा आमदार सतेज पाटील यांचा कामाचा वेग पाहून काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने त्यांना वेगवेगळ्या समित्यांवर काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

यामध्ये गोवा राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये काही मतदारसंघांची जबाबदारी त्यांच्यावर होती. कर्नाटकातील लक्षवेधी अथणी आणि अन्य काही मतदारसंघांची जबाबदारी आमदार सतेज पाटील यांच्यावर होती. नियोजनबध्द प्रचार यंत्रणा राबवत तेथील उमेदवार निवडून आणण्यात मोलाचा वाटा उचलला. पालकमंत्रिपद सांभाळताना साताऱ्याचे संपर्कमंत्रिपद सांभाळून तेथील कार्यकर्त्यांना न्याय देण्याचे काम त्यांनी केले. पश्चिम महाराष्ट्रासोबतच कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना उभारी देण्याचे काम ते करीत आहेत.

MLA Satej Patil
Kolhapur Lok Sabha : 'आमचं ठरलंय'नं पलटवली बाजी अन् बंटी पाटलांनी स्वतःच्या पराभवाचा काढला वचपा

दिल्लीदरबारी कौतुकाचा डंका

विधानसभा, विधानपरिषद अशा विधिमंडळांतील दोन्ही सभागृहांत काम केल्यामुळे संसदीय कामकाजाचे बारकावे सतेज पाटील यांनी समजून घेतले आहेत. त्यांच्या अनुभवाचा उपयोग पक्षाला व्हावा यासाठी पक्षाने त्यांना विधिमंडळ नेतेपदी नियुक्ती केली. जून २०२२ मध्ये महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर विधानपरिषदेत भक्कम विरोधी गटनेते म्हणून आमदार सतेज पाटील यांनी काम केले. त्यांची विधिमंडळातील भाषणे म्हणजे संसदीय अभ्यासपूर्ण विषयांचे विश्लेषण ठरली आहेत. त्यांच्या कार्याचा आलेख पाहून काँग्रेसने त्यांना लोकसभेच्या महाराष्ट्रासाठीच्या विविध समित्यांवर संधी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com