सोशल मीडिया आणि व्यायाम

सोशल मीडियापासून आजच्या जगात कुणीच वाचले नाही.
Social media
Social mediasakal

सोशल मीडियापासून आजच्या जगात कुणीच वाचले नाही. त्याचे काही फायदे आहेत तसेच काही तोटेही आहेत. प्रत्येकाचा फिटनेस प्रवास वेगळा असला तरी व्यायामाच्या नवीन कल्पना, प्रेरणा आणि मैत्रीपूर्ण सल्ल्यासाठी सोशल मीडिया उत्तम साधन आहे. तुमच्या समविचारी फिटनेस ग्रुपमध्ये सामील होण्याची संधी मिळू शकते. तुम्ही अनुभवी अॅथलीट किंवा व्यायामात नवशिके असलात तरी फिटनेस राखण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करून स्वतःला प्रोत्साहित ठेवू शकता. सोशल मीडियाचा अनेक क्षेत्रांवर मोठ्या प्रमाणावर प्रभाव पाडत आहे हे काही गुपित नाही. फिटनेस धाडसाबाबत किंवा प्रयोगाबाबत खुलेपणाने बोलता तेव्हा वाचकांचा विचार केला पाहिजे. अशा प्रकारचा प्रवास कोणीही सोशल मीडियावर शेअर करणे काही नवीन नाही, परंतु याचा अर्थ असा नाही की आपण सावधगिरी न बाळगता ते केले पाहिजे.

सोशल मीडियाचा परिणाम

स्वतःला जबाबदार धरणे सोपे आहे.

तुमचे यश शेअर करण्याची इच्छा तुम्हाला अधिक कठोर परिश्रम करण्यास प्रवृत्त करू शकते.

तुमच्या आहार, शरीर आणि मूडमधील बदलांचा मागोवा घेणे अधिक स्पष्ट आणि सोपे होते.

तेथील इतरांकडून प्रेरणादायी आणि आत्मविश्वास वाढवणाऱ्या कॉमेंट्समुळे अधिक सकारात्मक वाटणे सोपे आहे.

तुम्ही तुमच्या वर्कआऊटसाठी नवीन कल्पनांचा विचार करू शकता.

तरीही सोशल मीडियावरून अधूनमधून ब्रेक घेणे गरजेचे आहे. त्यामुळेच तुमचे लक्ष तुमच्या फिटनेसची उद्दिष्टांवरून ढळणार नाही. सोशल मीडियाचा सर्वांत चांगला भाग म्हणजे तुम्ही जगभरातल्या तुमच्या मित्रांशी, सहकाऱ्यांशी संपर्कात राहू शकता आणि अनोळखी लोकांना मित्र बनवू शकता. सोशल मीडियाचा अनेक उद्योगांवर प्रभावीपणे व्यापक प्रभाव पडत आहे आणि अनेक क्षेत्रातले व्यावसायिक एकमेकांशी जोडले जात आहेत. हा व्यावसायिक दृष्टिकोन फिटनेसच्या संदर्भात असल्यास तुम्हाला तुमचा हा संपर्क नक्कीच उपयोगी पडेल. कदाचित तुमच्या वेलनेस अॅडव्हेंचर दरम्यान तुम्हाला योगासनांसारखी एखादी आवड सापडल्यास स्वतःचे शिकवण्याचे वर्ग सुरू करू शकता.

तुमचा स्वतःचा स्टुडिओ उघडत असाल, किंवा चविष्ट खाण्याची इतरांची आवड पुरवत असाल किंवा जवळच्या जिममध्ये ट्रेनर म्हणून काम करत असाल, सोशल मीडियावर तुमची उपस्थिती तुम्हाला यश मिळवून देण्यास मदत करते. तुमच्या नवीन सापडलेल्या कनेक्शनबद्दल खरंतर तुम्ही सोशल मीडियाचे आभारच मानले पाहिजे. या मार्गाने इतर व्यावसायिकांना सहन करावे लागणारे नुकसान देखील तुम्हाला होण्याचा धोका नाही. ऑनलाइन प्रभावी असणे आणि स्वतःला चांगला प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करणे हा एक उत्तम मार्ग आहे. यामुळे तुम्ही फिटनेस आणि व्यायामाला एका उंचीवर घेऊन जाल ज्यामुळे ते एक काम न वाटता आनंदाचे साधन होईल.

आपल्या जीवनात सोशल मीडियाची अनेकदा महत्त्वाची भूमिका असते. अर्थात, काही जण त्याचा अधिक वापर करतात आणि काही लोकांना त्याशिवाय पूर्णपणे चांगले वाटते. तथापि, सोशल मीडिया आणि त्याची मदत करण्याच्या क्षमतेबद्दल सांगण्यासारखे बरेच काही आहे, केवळ फिटनेसच नव्हे तर जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये सर्वांना प्रेरणा देणारे साधन म्हणून त्याच्याकडे बघता येईल. सोशल मीडियाचा वापर आपल्या सदसदविवेकबुद्धीनेच करावा हे ही तितकेच खरे! जास्तीत जास्त लोकांशी जोडले जाणे, प्रोत्साहित करणे आणि राहणे आणि आपल्या फिटनेसची अभिमानाने इतरांपर्यंत पोचवण्यासाठी या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com