नवी दिल्ली - काश्मीरमधील पहलगामच्या नजिक बैसरन खोऱ्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी 22 एप्रिल रोजी 26 भारतीय हिंदू पर्यटकांना लक्ष्य करीत वेचून वेचून ठार केले. या घटनेचे तीव्र पडसाद साऱ्या जगभर उमटत आहेत. हल्ला लष्कर-ए-तैयबाप्रणित टीआरएफच्या चार दहशतवाद्यांनी केला.
हत्याकांडाचा भारताने वचपा घेण्यापूर्वी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा असीफ यांनी दहशतवाद्यांना अनेक दशके आश्रय देण्याबाबत केलेले विधान, पाकिस्तान ही दहशतवादाची जननी आहे, हे स्पष्ट करते. `हे घाणेरडे काम अमेरिका व ब्रिटनसाठी आम्ही करीत होतो,’ असे सांगून त्यांनी या दोन्ही देशांनाही गोवण्याचा प्रयत्न केला आहे.