Why India’s Unity Is Fading
esakal
तेजस्वी बारब्दे पाटील,
नेत्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( शरदचंद्र पवार )
भारत हा विविधत परंपरांनी सजलेला देश आहे. अनेक धर्माची, जातीची माणसं इथे राहतात. त्या माणसांच्या भाषा वेगळ्या आहेत, सण वेगळे आहेत, संस्कृती वेगळी आहे. आणि या सर्वांना आपल्या देशाने बांधून ठेवलंय, हाच या भारताचा यूएसपी आहे. या आपल्या देशात वेगवेगळ्या धर्माची माणसं गुण्यागोविंदाने एकत्र नांदतात. एकमेकांच्या संस्कृती स्वीकारणे, हाच आपला संस्कार. एकमेकांच्या पद्धती, सणं आनंदाने स्वीकारणे हे आपलं मूल्य आहे. मात्र आपली संस्कृती दुसऱ्यावर जबरदस्तीने लादने किंवा दुसऱ्याच्या संस्कृतीला नाकारणे हे आपल्या लोकशाही स्वीकारणाऱ्या देशात मान्य होणे शक्य नाही. आपलं मूळच तसं नाहीय. मात्र अलीकडे परिस्थिती जरा बदललीय. 'मला जे आवडतं ते तुला आवडावंच' हा जो अट्टाहास आता समाजात वाढलाय, तो खरोखरच गंभीर आहे.