esakal | अरे बापरे ! मित्रमंडळ चौकातील डीपीची अवस्था पहा...  
sakal

बोलून बातमी शोधा

mitramandal chowk dp.jpg

मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली आहे. या डीपीला दरवाजा नसून डीपी पूर्णपणे उघडा ठेवण्यात आला आहे.

अरे बापरे ! मित्रमंडळ चौकातील डीपीची अवस्था पहा...  

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली आहे. या डीपीला दरवाजा नसून डीपी पूर्णपणे उघडा ठेवण्यात आला आहे. डीपीची खालची बाजू कुजलेली आहे. पत्राही तुटलेला आहे. सध्या पावसाचे वातावरण आहे.

आयटी पार्कमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय; आज कोणत्या भागात, किती रुग्ण आढळले पाहा 

पाऊस आला तर डीपीच्या आजूबाजूला वीजप्रवाह निर्माण होऊ शकतो. अशा प्रकारे डीपी उघडा ठेवला तर परिसरातील नागरिकांना धोका आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. महावितरणे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. डीपीचे दार लवकरात लवकर बसवावे अशी मागणी होत आहे.        

लॉकडाऊनमधील लग्नाचा नवीन ट्रेंड; नवरा-नवरीला मिळतोय मॅचिंग मास्क

दवाखान्यापाशी डीपी उघडा असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. महावितरणने याकडे लक्ष द्यावे.

-शेखर कव्हे, नागरिक