सुखद : माणूसकी आली धावून, व्हाटसअप ग्रुपमुळे 50 कुटूंबांना मिळालं पोटभर जेवण

सुषेन जाधव
Saturday, 25 April 2020

व्हॉट्सॲप ग्रुपचा एखाद्या विधायक कामासाठी कसा सुयोग्य वापर होऊ शकतो याचा उत्तम वस्तुपाठ सुमेत सामाजिक संस्थेने घालून दिला आहे. या सामाजिक संस्थेच्या व्हॉट्सॲप ग्रुपच्यावतीने शहरामधील विविध भागातील ५० गरजू कुटुंबीयांना धान्य वाटप करण्यात आले आहे. 

औरंगाबाद : व्हॉट्सॲप ग्रुपचा एखाद्या विधायक कामासाठी कसा सुयोग्य वापर होऊ शकतो याचा उत्तम वस्तुपाठ सुमेत सामाजिक संस्थेने घालून दिला आहे. या सामाजिक संस्थेच्या व्हॉट्सॲप ग्रुपच्यावतीने शहरामधील विविध भागातील ५० गरजू कुटुंबीयांना धान्य वाटप करण्यात आले आहे. 
मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठीक्लिक करा
सुमेत सामाजिक संस्था ही दहा वर्षांपासून औरंगाबाद शहर व जिल्ह्यांमध्ये सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील मोलमजुरी करणाऱ्या व निराधार असलेल्या हजारो कुटुंबीयांवर उपासमारीचे संकट ओढवले. संवेदनशीलपणा दाखविण्याची हीच वेळ म्हणून या संस्थेकडून मुख्यमंत्री सहायता निधीस पाच हजार रुपये देण्यात आले आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठीक्लिक करा

संस्थेकडून २५ निराधार, गरीब, गरजू कुटुंबीयांना मदत करण्यासाठी स्वेच्छेने रुपये १००-२०० रुपये मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनास व्हॉट्सॲप ग्रुपच्या सदस्यांसह इतर दानशूर व्यक्तींनीही प्रतिसाद दिला व दोनच दिवसांत संस्थेने पंधरा हजार रुपये उभे केले. यातून संस्थेने जयभीमनगर, भावसिंगपुरा व शहरामधील विविध भागांतील ५० कुटुंबीयांना धान्य वाटप केले. \

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठीक्लिक करा

सुमेत सामाजिक संस्थेने आणखी गरजू कुटुंबीयांना धान्य वाटप करण्याचे ठरविले असून, दानशूर व्यक्तींनी देणगी देण्यासाठी ७३८५१८९३०२ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. यासाठी संस्थेचे सचिव संजय बनसोडे, त्रिशरण बोरडे, आनंद बोरडे, संजीव बनसोडे, सुरेश सुखधान, मीरा रामटेके, विश्वा राऊत, रेखा खरात, आरती घाटे आदींनी सहकार्य केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Daily Need supply Through Whats App Group Aurangabad News