esakal | भारतात कोरोना तिसऱ्या टप्प्यात; इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचा अहवाल
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus ICMR study points to community transmission

इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने एक अहवाल सादर केला असून त्या अहवालात असे सूचित केले गेले आहे की देशातील काही भागांमध्ये कम्युनिटी ट्रान्समिशन होण्यास सुरूवात झाली आहे. याचा अर्थ भारतात तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे.

भारतात कोरोना तिसऱ्या टप्प्यात; इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचा अहवाल

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने एक अहवाल सादर केला असून त्या अहवालात असे सूचित केले गेले आहे की देशातील काही भागांमध्ये कम्युनिटी ट्रान्समिशन होण्यास सुरूवात झाली आहे. याचा अर्थ भारतात तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने काही आठवड्यांपूर्वी रॅंडम सॅम्पलिंगद्वारे कोरोना विषाणूची तपासणी सुरू केली होती. कोरोनाचे संक्रमण कम्युनिटी ट्रान्समिशनने तर होत नाही आहे ना, यासाठी इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने या तपासणीस सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी भारतात काही भागात कोरोना तिसऱ्या टप्प्यात असल्याचे सांगितले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

फेब्रुवारी ते 2 एप्रिल या काळात इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने कोरोना विषाणूच्या 5911 संशयित रुग्णांची गंभीर तीव्र श्वसन आजार चाचणी केली. यांपैकी 104 म्हणजे 1.8 टक्के रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह होते. देशातील 15 राज्यांमधील 36 शहरांमध्ये या चाचण्या घेण्यात आल्या होत्या. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या रिपोर्टनुसार 5911प्रकरणांपैकी केवळ २ पॉझिटिव्ह प्रकरणे अशी आहेत, ज्यातील एक रुग्ण कोरोना रूग्णाच्या थेट संपर्कात होता. दुसरे प्रकरण आंतरराष्ट्रीय प्रवासाशी संबंधित आहे. तर, 59 प्रकरणे अशी आहेत ज्यांचा आंतरराष्ट्रीय प्रवास इतिहास नाही. म्हणजेच त्यांना देशभरात संसर्ग झाला आहे. 

सचिवांकडून २३ जणांना महाबळेश्वरला जाण्याची परवानगी; गृहमंत्र्यांकडून कारवाई

इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचा पहिला अहवाल 14 मार्च रोजी आला होता. त्यावेळी कोरोना तपासणी केलेल्या लोकांची कोणतीही चाचणी पॉझिटिव्ह नव्हती. त्यानंतर, 15 ते 21 मार्च दरम्यान तपासणी केलेल्या 106 पैकी केवळ 2 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. 22 मार्च ते 28 मार्च दरम्यान झालेल्या 2877 रूग्णांपैकी 48 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. त्याचप्रमाणे दुसर्‍या चाचणीत असेही म्हटले आहे की कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 83.3 % रुग्ण 50 वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते. तर, 81.4% रुग्ण 40 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत.

loading image
go to top