महत्त्वाची बातमी : कोरोना पसरू लागल्याने, आता अशी होणार चाचणी

coronavirus maharashtra updates icmr changes testing system
coronavirus maharashtra updates icmr changes testing system

पुणे Coronavirus : कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता, आता परदेशवारी करणाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांचीही चाचणी घेण्यात येणार आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) वतीने शुक्रवारी (ता.20) कोरोना चाचणी संदर्भातील धोरणात बदल करण्यात आला आहे. यानूसार 14 दिवस "होम क्वारंटाईन'मध्ये असलेले नागरिक आणि त्यांचे कुटुंबीय ज्यांना ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळली आहेत. अशा नागरिकांच्या घश्‍यातील द्रव पदार्थाची चाचणी घेण्यात येणार आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार जगभरातील 182 देश "कोविड-19' या विषाणूमूळे प्रभावित झाले आहे. देशातील कोरोना विषाणू प्रसाराचा पहिला टप्पा आंतरराष्ट्रीय विमान प्रवाश्‍यांमूळे सुरु झाला. त्याच्या संपर्कात आलेल्या जवळच्या व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्यामुळे दूसऱ्या टप्प्यात कोरोना पसरण्यास सुरवात झाली. दिवसेंदिवस कोराना बाधितांची संख्या वाढत आहे. आता बाधितांपासून इतरांना प्रसार झाल्याची खात्रीलायक माहिती आपल्याकडे उपलब्ध नाही. याचा विचार करता "आयसीएमआर'च्या वतीने चाचणीसंदर्भातील धोरणांमध्ये बदल करण्यात आला आहे. आवश्‍यकता भासल्यास किंवा तिसऱ्या टप्प्याची चाहूल वाटल्यास या धोरणात आवश्‍यक बदल करण्यात येईल असे, कोरोना विरुद्धच्या राष्ट्रीय कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे. या आधीही 9 आणि 16 मार्चमध्येही असे बदल करण्यात आले होते.

असे आहे नवे धोरण 

  • चौदा दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय प्रवास करणारे नागरिक आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्तींच्या स्वॅबची चाचणी (सर्दी, ताप, खोकला असल्यास) 
  • बाधीत रुग्णांच्या संपर्कातील सर्व व्यक्ती आणि सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये लक्षणे दिसल्यास होणार चाचणी 
  • सर्व हॉस्पिटलाईट रुग्णांमध्ये लक्षणे आढळल्यास त्यांचीही चाचणी केली जाणार 
  • हॉस्पीटलमध्ये दाखल श्‍वसनासंबंधीचे आजार असलेल्या रुग्णांची होणार चाचणी 
  • ज्यांना होम क्वारंटाईनची सूचना करण्यात आली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनाही होम क्वारंटाईन राहण्याचे निर्देश. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com