Coronavirus : राज्यात 39 जण कोरोनामुक्त, पण लागण झालेले रुग्णही वाढले

Corona-in-Maharashtra
Corona-in-Maharashtra

पुणे - राज्यात कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेल्या आणखी १८ रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २२१ झाली आहे. तसेच, कोरोनाचा संसर्गाच्या दोन रुग्णांचा आज मृत्यू झाला.  त्यापैकी एक पुण्याचा रुग्ण असून, दुसरा मुंबईचा आहे. आतापर्यंत या आजाराने राज्यात दहा जण मृत्युमुखी पडले आहेत.

नवीन रुग्णांमध्ये ८ रुग्ण मुंबईचे आहेत तर ६ रुग्ण पुण्याचे, २ नागपूरचे, तर नाशिक आणि कोल्हापूर येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. एका ७८ वर्षीय पुरुषाचा मुंबईतील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांना उच्च रक्तदाब आणि हृदयरोग हे इतर आजारही होते.

राज्यात ३२८ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात १८ जानेवारीपासून आजपर्यंत ४,५३८ जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी तीन हजार ८७६ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोनासाठी निगेटिव्ह आले आहेत तर २२० जण पॉझिटिव्ह आहेत.  आतापर्यंत ३९ करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 

सध्या राज्यात १९ हजार १६१  व्यक्ती होम क्वारंटाइन असून एक हजार २२४ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

पुण्यात पहिला मृत्यू
कोरोना विषाणूंचा संसर्गामुळे पुण्यात एका रुग्णाचा आज मृत्यू झाला. या रुग्णाच्या संपर्कातील ३६ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी कोणालाही कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. त्यामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाला नेमका संसर्ग झाला कसा, याची निश्चित माहिती मिळाली नसल्याचे आरोग्य खात्यातर्फे सांगण्यात आले. 

पुण्यात रहाणाऱ्या ५२ वर्षीय पुरुषाचा मृत्यू कोरोनामुळे झाला. त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाब होता. त्यांना खासगी रुग्णालयात २१ मार्चला उपचारासाठी दाखल केले होते. त्यांना खासगी रुग्णालयात २१ मार्च रोजी उपचारासाठी दाखल केले. या दरम्यान, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मृत्यू झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांची आणि संपर्कातील व्यक्तींची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली आहे. 

दरम्यान, पुण्यातील चार रुग्णांना कोरोना विषाणूंचा संसर्ग झाल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. त्यातील दोन रुग्ण हे एका खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या रुग्णाचे नातेवाईक आहेत. तर, तिसरा रुग्ण हा बर्म्युडा येथून प्रवास करून पुण्यात आला आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या एका व्यक्तिलाही संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com