Coronavirus : लोकप्रतिनिधींच्या वेतनात ६० टक्के कपात; तर, कर्मचाऱ्यांचेही वेतन कापणार

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 31 March 2020

  • मुख्यमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधींच्या वेतनात ६० टक्के कपात
  • शासकीय कर्मचाऱ्यांनाही मार्चमध्ये ५० ते  ७५ टक्केच वेतन
  • कामगार संघटनांशी चर्चा केल्यानंतर महत्वपूर्ण निर्णय..

मुंबई : ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्य व आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून, विधीमंडळाचे सर्व सदस्य तसेच स्थानिक स्वराज संस्थांच्या सदस्यांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींच्या मार्च महिन्याच्या वेतनात ६० टक्के कपात करुन त्यांना ४० टक्के वेतन देण्यात येणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यातील ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात ५० टक्के कपात करण्यात आली असून त्यांना निम्मे वेतन देण्यात येणार आहे. ‘क’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांना ७५ टक्के वेतन मिळेल. ‘ड’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. राज्य शासकीय अधिकारी-कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहितीही उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

Coronavirus : क्वारंटाईन म्हणजे नेमकं काय? ते केल्याने काय होईल?

‘कोरोना’चं संकट आणि ‘टाळाबंदी’मुळे राज्याच्या आर्थिक उत्पन्नात झालेली घट लक्षात घेऊन तसेच ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्याला नैतिक आणि आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

सलमान खानच्या पुतण्याचे मुंबईत निधन

विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे तसेच राज्यातील सर्व स्थानिक स्वराज संस्थांचे अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य तसेच राज्यातील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी या निर्णयाला पाठिंबा, सहकार्य देतील असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus salaries will be deducted of Government employees says ajit Pawar