ठाणे जिल्ह्यात आता कम्युनिटी किचन

दीपक शेलार
Saturday, 4 April 2020

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या "लॉकडाऊन'मुळे अनेक उद्योग-व्यवसायातील कामगार प्रभावित झाले आहेत. यात परराज्यांतील अनेक जण स्थलांतर करीत आहेत. जिल्हा प्रशासनाकडून सामाजिक संस्था, बांधकाम व्यावसायिक, गुरुद्वार आणि इतर संस्थांच्या मदतीने या नागरिकांना दररोज मोफत भोजन वाटप केले जात आहे. पुढील टप्प्यात अशा व्यक्तींसाठी सरकारच्या आदेशानुसार केंद्रीय मध्यवर्ती स्वयंपाक गृह अर्थात "कम्युनिटी किचन' उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले.

ठाणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या "लॉकडाऊन'मुळे अनेक उद्योग-व्यवसायातील कामगार प्रभावित झाले आहेत. यात परराज्यांतील अनेक जण स्थलांतर करीत आहेत. अशा कामगारांसह विस्थापित मजूर व बेघर व्यक्तींच्या निवारागृह, अन्नपाणी, वैद्यकीय देखभाल या सुविधांसाठी ठाण्यात 78 निवारा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाकडून सामाजिक संस्था, बांधकाम व्यावसायिक, गुरुद्वार आणि इतर संस्थांच्या मदतीने या नागरिकांना दररोज मोफत भोजन वाटप केले जात आहे. पुढील टप्प्यात अशा व्यक्तींसाठी सरकारच्या आदेशानुसार केंद्रीय मध्यवर्ती स्वयंपाक गृह अर्थात "कम्युनिटी किचन' उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले. 

लॉकडाऊनमुळे इंटरनेटचा वेग मंदावला; तक्रीरींमध्ये झाली तिपटीने वाढ

जिल्हा परिषद, महापालिका शाळा-विद्यालय, सार्वजनिक मैदाने, समाज मंदिर, खासगी मंगल कार्यालये, धार्मिक प्रार्थनास्थळे, धर्मादाय संस्था, कृषी उत्पन्न बाजार समिती आदी ठिकाणी कम्युनिटी किचन तयार करण्याचे आदेश सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. 

ठाणे परिसरात दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहात तर नवी मुंबईतील एक्‍झिबिशन सेंटरमध्ये सध्या निवारा केंद्रे सुरू आहेत. याठिकाणी विविध संस्थांकडून आलेले अन्नपदार्थ वाटप केले जात असले तरी त्यानंतरच्या काळात येथील नागरिकांच्या जेवणासाठी "कम्युनिटी किचन' उभारण्यात येणार आहेत. तात्पुरत्या स्वरूपात "कम्युनिटी किचन' सुरू करण्याकरिता ठिकाणे निश्‍चित करण्याचे काम सध्या सुरू आहे. 

अशा लोकांना गोळ्या घातल्या पाहिजेत : राज ठाकरे 

प्रत्येक ठिकाणी आवश्‍यक ती भांडी, स्वयंपाकासाठी लागणारे आवश्‍यक साहित्य व पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. किचनमार्फत अन्न तयार करणाऱ्या व्यक्तींना व समूहाला आवश्‍यक अन्नधान्य पुरवठा हा स्वयंसेवी संस्था व संस्थांमार्फत गोळा करण्यात आलेले अन्नधान्य यातून व मदत पुनर्वसन विभागामार्फत राज्य आपत्ती प्रतिसाद विभागाकडून उपलब्ध झालेल्या निधीमधून भागविण्यात येणार आहे. तसेच अशाप्रकारे कम्युनिटी किचनद्वारे भोजन करताना अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत भोजन योजनेअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या केंद्राशी योग्य समन्वय राखण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. 

भारतीय अन्न महामंडळाच्या निर्देशानुसार राज्य सरकारच्या अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात कम्युनिटी किचन उभारण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार विविध संस्था व मंडळांना अन्न शिजवण्यासाठी लागणारा गहू ओपन मार्केट सेल स्कीमच्या (ओएमएसएस) दराने उपलब्ध करण्यात येणार आहे. 
- राजेश नार्वेकर, 
जिल्हाधिकारी, ठाणे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now a community kitchen in Thane district