Corona Virus : पुण्यात सर्वधर्मीय धार्मिक स्थळे नागरीकांसाठी बंद 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 मार्च 2020

- सर्व धर्मीयांच्या धार्मिक स्थळाच्या ठिकाणी नागरिक एकत्र येऊन त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता दाट शक्यता आहे.
-हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व धर्मीय नागरिकांना त्यांच्या प्रार्थनास्थळावर सामुदायिकरित्या जमण्यास मनाई करण्यात आली आहे.
- धार्मिक स्थळावर पारंपरिक पूजा, विधी करण्यासाठी व्यवस्थापनाने नेमलेल्या पुजारी किंवा धर्मगुरुंना परवानगी असणार असल्याचे आदेशात नमुद केले आहे.

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शहरातील पुणे पोलिसांनी शहरातील सर्वधर्मीय धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळे नागरीकांसाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलिस सहआयुक्त डॉ.रवीन्द्र शिसवे यांनी सोमवारी रात्री उशिरा याबाबतचा आदेश काढला. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सोमवार (ता.23) पासून ते 31 मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत हा आदेश लागू करण्यात आला आहे. त्यानुसार, फौजदारी दंड संहिता कलम 144 अन्वये हा आदेश देण्यात आला आहे. हा आदेश शहरातील सर्व धर्मीयांना लागू असणार आहे, असे डॉ. शिसवे यांनी आपल्या आदेशात स्पष्ठ केले आहे.

coronavirus : वाढवा तुमची रोगप्रतिकारशक्ती
सर्व धर्मीयांच्या धार्मिक स्थळाच्या ठिकाणी नागरिक एकत्र येऊन त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता दाट शक्यता आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व धर्मीय नागरिकांना त्यांच्या प्रार्थनास्थळावर सामुदायिकरित्या जमण्यास मनाई करण्यात आली आहे. धार्मिक स्थळावर पारंपरिक पूजा, विधी करण्यासाठी व्यवस्थापनाने नेमलेल्या पुजारी किंवा धर्मगुरुंना परवानगी असणार असल्याचे आदेशात नमुद केले आहे.

राज्यात संचारबंदी ; जिल्ह्यांच्या सीमाही बंद 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All religious places of the city closed for citizens in pune due to corona Virus