धक्कादायक : दिल्लीतील ‘त्या’ कार्यक्रमात पुण्यातील ४० जण झाले सहभागी

टीम ई-सकाळ
मंगळवार, 31 मार्च 2020

दिल्लीतील निजामुद्दीन येथील एका मशिदीमध्ये झालेल्या एका धार्मिक कार्यक्रमात तब्बल ३ हजार जण सहभागी झाले होते.

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात संचारबंदी लागू असतानाही दिल्लीतील निजामुद्दीन येथील मशिदीमध्ये तीन हजार जणाच्या उपस्थितीत झालेल्या एका धार्मिक कार्यक्रमात महाराष्ट्रातील १३६ जणाचा सहभाग असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यामध्ये पुण्यातील ४० जणाचा सहभाग होता, त्यांचा पोलिसांनी शोध घेतला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

केरळ, महाराष्ट्रासह देशात कोरोनाचा शिरकाव सुरू असतानाच दिल्लीतील निजामुद्दीन येथील एका मशिदीमध्ये झालेल्या एका धार्मिक कार्यक्रमात तब्बल ३ हजार जण सहभागी झाले होते. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या काही जणांना कोरोना झाल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या कार्यक्रमात देश व अन्य देशातून आलेले लोक सहभागी झाले होते. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात कोरोनाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता व्यक्त होऊ लागली आहे. दरम्यान, या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून १३६ जण सहभागी झाले होते. त्यामध्ये पुण्यातील ४० जणाचा समावेश होता. पुणे पोलिसांनी त्यांचा २४ मार्चपासून त्यांचा शोध सुरू केला. त्यामध्ये ४० जण सापडले आहेत. त्यांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे.

आणखी वाचा - तबलीगी जमातची नियमांकडे डोळेझाक; या तारखा पाहा

आणखी वाचा - कोल्हापुरात कोरोना कक्षातील दोघांचा मृत्यू 

दिल्लीतील कार्यक्रमात महाराष्ट्रातून १३६ सहभागी झाले होते. त्यापैकी ४० जण पुण्यातील आहेत. त्यांचा आम्ही शोध घेतला असून त्यांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे.
- अशोक मोराळे, अतिरिक्त पोलिस आयुक्त, गुन्हे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus 40 people participated tablighi jamaat markaz from pune