esakal | ब्रेकिंग - कोल्हापूरमध्ये कोरोना कक्षातील दोघांचा मृत्यू  
sakal

बोलून बातमी शोधा

Two killed in Corona orbit in Kolhapur

गेल्या दोन दिवसांपासून ती व्हेंटिलेटरवर होती. आज सकाळी तिच्या घशातील स्त्रावाचा नमुना पुण्याला तपासणी पाठवण्यात आला होता. ही महिला किंवा त्यांच्या नातेवाईकांपैकी कोणीतरी अलिकडेच श्रीलंकेला जाऊन आल्याचे समजते

ब्रेकिंग - कोल्हापूरमध्ये कोरोना कक्षातील दोघांचा मृत्यू  

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - येथील छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालयातील कोरोना कक्षात उपचार घेत असलेल्या हातकणंगले येथील 37 वर्षीय तरूणाचा आज सायंकाळी मृत्यू झाला. कोरोना संशयित म्हणून त्याला या कक्षात दोन दिवसांपूर्वी दाखल करण्यात आले होते. एका खाजगी रूग्णालयातही आज 81 वर्षीय कोरोना संशयित वृध्देचा मृत्यू झाला आहे. या महिलेचा स्वॅब आज सकाळी पुण्याला पाठवण्यात आला होता, त्याचाही अहवाल प्रलंबित आहे.

हे पण वाचा - लॉकडाऊनच्या काळात वाहनांची काळजी कशी घ्याल?
 
हातकणंगलेच्या तरूणावर गेल्या काही दिवसांपासून ताराबाई पार्कातील एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू होते. त्याच्यात न्युमोनियाची लक्षणे दिसत होती. दोन दिवसांपूर्वी त्याची प्रकृत्ती खालावल्याने त्याला सीपीआरमधील कोरोना कक्षात दाखल करण्यात आले होते. काल त्याच्या घशातील स्त्रावाचा नमुना पुण्याला तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. आज उपचार सुरू असताना सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. तो परदेशातून किंवा कोरोना बाधित कोणत्याही शहरातून आल्याची नोंद नाही. 

हे पण वाचा -  शेजारधर्म नको गं माय... नाय तर कोरोना घरात येईल ना माय... 

कदमवाडी परिसरातील एका रूग्णालयात न्युमोनियावर उपचार घेत असलेल्या 81 वर्षीय वृध्देचाही आज मृत्यू झाला. या महिलेला चार दिवसांपूर्वी उपचारासाठी या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या दोन दिवसांपासून ती व्हेंटिलेटरवर होती. आज सकाळी तिच्या घशातील स्त्रावाचा नमुना पुण्याला तपासणी पाठवण्यात आला होता. ही महिला किंवा त्यांच्या नातेवाईकांपैकी कोणीतरी अलिकडेच श्रीलंकेला जाऊन आल्याचे समजते, पण याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.