Coronavirus : पिंपरीत गरजू लोकांना मिळणार फूड पॅकेट; 'या' दहा ठिकाणी व्यवस्था

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 April 2020

 • तहसिलदार कार्यालयाकडून १० ठिकाणी व्यवस्था

पिंपरी : शहरातील गरजू आणि गरीब लोक अन्नापासून वंचित राहू नये म्हणून पिंपरी चिंचवड अप्पर तहसिलदार कार्यालयाने शहरात १० ठिकाणी फूड पॅकेटस् वितरणाची व्यवस्था केली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने सकाळी १० ते दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत हे फूड पॅकेटस् दिले जाणार आहेत, गरजू लोकांनी हे पॅकेटस् घेऊन जावेत, असे आवाहन अप्पर तहसिलदार गीता गायकवाड (पिंपरी चिंचवड) यांनी केले आहे. अधिक माहिती साठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष, अप्पर तहसिलदार कार्यालय (कोविड-19), दूरध्वनी क्रमांक - 020- 27642233 यावर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. याशिवाय, पालिकेची निवारा केंद्रांवर देखील फूड पॅकेटस्ची व्यवस्था करण्यात आली आहे.

भारतात कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात; इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचा इशारा 

स्वयंसेवी संस्था, त्यांचे ठिकाण आणि संपर्क क्रमांक पुढील प्रमाणे - 

 • लक्ष्य फाउंडेशन, मोशी (9422014078)
 • राकेश चार्कोडे फाउंडेशन, काळेवाडी (9657709090)
 • समाप्रिय फाउंडेशन, वाल्हेकरवाडी (9595910066)
 • पीसीसीएफ, एम्पायर स्वेअर (9767108686)
 • पोलिस मित्र नागरिक संघटना, साने चौक (9503332095)
 • अग्रसेन संघटना, उर्दू माध्यमिक शाळा, आकुर्डी (9011019419)
 • संस्कार सोशल फाउंडेशन, वाल्हेकरवाडी (8484998689)
 • धर्म विकास संस्था, रावेत (9923800181)
 • काळभैरव नाथ उत्सव समिती, जनकल्याण समिती, पूर्ण पिंपरी चिंचवड (9372937598)
 • विद्या सेवा ग्रुप, चिंचवड स्टेशन (9423569815)
 • अ क्षेत्रीय कार्यालय, आकुर्डी उर्दू माध्यमिक विद्यालय, खंडोबा माळ, आकुर्डी (888844210)
 • ब क्षेत्रीय कार्यालय, केशवनगर विद्यालय, चिंचवड गाव (8928323916, 9922501701)
 • ड क्षेत्रीय कार्यालय, अण्णासाहेब मगर विद्यालय, पिंपळे सौदागर (9923989774, 9922501791)
 • इ क्षेत्रीय कार्यालय, छत्रपती प्राथमिक विद्यालय, भोसरी संकुल (7796162243, 9922501737)
 • ह क्षेत्रीय कार्यालय, हुतात्मा भगतसिंह विद्यालय, दापोडी (7722060926, 9922501719)
 • रात्र निवारा केंद्र, पिंपरी (9922501255)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus Food packets for needy people In Pimpri