esakal | 'क्वारंटाईन' रुग्णालयात बाथरूम तुंबले, जेवणाचे हाल; उद्देशाला फासला जातोय हरताळ
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus quotes hospital unhinged situation limited food

पर्वती दर्शन येथील एकाला 'कोरोना'ची लागन झाल्याने तेथील काही नागरिकांना महापालिकेच्या दवाखान्यात क्वारंटाईन केले आहे.

'क्वारंटाईन' रुग्णालयात बाथरूम तुंबले, जेवणाचे हाल; उद्देशाला फासला जातोय हरताळ

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पुणे Coronavirus : सिंहगड रस्त्यावरील लायगुडे दवाखान्यातील क्वारंटाईन केलेल्या नागरिकांच्या रुममधील बाथरूम तुंबले असून, दुसऱ्याच्या रुममध्ये जाऊन अंघोळ करण्याची नामुष्की आली आहे. जेवणाची गौरसोय होत असून, अवेळी जेवण दिले जात आहे. यापेक्षा आम्ही आमच्या घरात व्यवस्थीत राहू अशी कैफियत क्वारंटाईन केलेल्या नागरिकाने 'सकाळ'कडे मांडली.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आणखी वाचा - न्यूयॉर्कमध्ये लागली मृतदेहांची रांग

एकूण 40 जण क्वारंटाइन
पर्वती दर्शन येथील एकाला 'कोरोना'ची लागन झाल्याने तेथील काही नागरिकांना महापालिकेच्या दवाखान्यात क्वारंटाईन केले आहे. यामध्ये लहान मुलींचाही समावेश आहे. सध्या तेथे सुमारे ४० जणांना क्वारंटाइन केले आहे. क्वारंटाईन केलेल्या नागरिकाने सांगितले की, "आमची व्यवस्था जेथे केली आहे, तेथील बाथरूम कायम तुंबत आहे. महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयातील लोक दुरूस्ती करून गेल्यावरही बाथरूम तुंबत आहे. दुसऱ्यांच्या रुममध्ये जाऊन अंघोळ करावी लागते आहे. त्यामुळे वेगळे राहून काहीच उपयोग नाही. तसेच प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भाजी व पोळ्या बांधून दिल्या जातात. पत्रवळीत त्यामध्ये जेवता येत नाही. तसेच सकाळी नाष्टा उशीरा येतो, जेवण दुपारी अडीचला येते. येथे लहान मुले असल्याने त्यांचा ही विचार महापालिकेने केला पाहिजे, असे क्वारंटाईन केलेल्या नागरिकाने सांगितले. नायडू रुग्णालयाची क्षमता संपत आल्याने, उपचाराची पर्यायी लायगुडे रुग्णालयात केली जाणार आहे, येथील सुविधा सुधारण्यासाठी मनपाने युद्धपातळीवर कामे केली पाहिजेत, अशी मागणी शिवसेनेचे विभाग प्रमुख महेश पोकळे यांनी केली.

आणखी वाचा - 15 एप्रिलनंतर रेल्वे सुरू होणार?


बाथरूममध्ये पाणी तुंबत असल्याने दुरूस्ती केली होती. उद्या पुन्हा कर्मचारी पाठवून तेथील प्रश्न मार्गी लावला जाईल. नायडू रुग्णालयातून अचानक लोक क्वारंटाईन साठी पाठविले जातात. त्यामुळे जेवणाचे नियोजन बिघडत आहे. याकडे लक्ष दिले जाईल.
- चेतन कबाडे, क्षेत्रीय अधिकारी, टिळक रस्ता क्षेत्रीय अधिकारी

loading image