Coronavirus : आर्थिक संकटात सापडलेल्या कॅबचालकांना 'उबर'ची साथ

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 April 2020

कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या कॅबचालकांना 'उबर इंडिया'ने मदतीचा हात पुढे केला आहे. कुटुंबाच्या महिन्याच्या गरजा भागतील, एवढे पैसे कॅब चालकांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यास गुरुवारपासून  सुरवात केली. 

पुणे : कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या कॅबचालकांना 'उबर इंडिया'ने मदतीचा हात पुढे केला आहे. कुटुंबाच्या महिन्याच्या गरजा भागतील, एवढे पैसे कॅब चालकांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यास गुरुवारपासून  सुरवात केली. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'उबर इंडिया'ने 'उबर केअर ड्रायव्हर फंड' उभारला आहे. त्यात पंचवीस कोटी रुपये कंपनीने टाकले आहेत. त्यातून उबरने देशातील 55 शहरांमधील कॅब चालकांना विशिष्ट रक्कम देण्यास सुरुवात केली आहे. देशातील एकूण किती कॅब चालक आणि त्यांना किती रक्कम देणार, हे उबरने जाहीर करण्यास नकार दिला आहे. 

भारतात कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात; इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचा इशारा

'उबर इंडिया'चे अध्यक्ष प्रदीप परमेश्वरन 'सकाळ'शी बोलताना म्हणाले,"सगळेच कॅब चालक सध्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या वेळी सामाजिक जबाबदारी म्हणून त्यांना मदत केली पाहिजे, अशी कंपनीची भूमिका आहे. त्यासाठीच ड्रायव्हर फंड उभारण्यात आला आहे. एका कॅब चालकाच्या चार आठवड्यांच्या किमान गरजा भागतील, एवढे पैसे त्याच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यास कालपासून आम्ही सुरुवात केली आहे." हे पैसे चालकाला परत करावे लागणार नाहीत, कंपनीने केलेली मदत आहे, असेही त्यांनी सांगितले.  

सचिवांकडून २३ जणांना महाबळेश्वरला जाण्याची परवानगी; गृहमंत्र्यांकडून कारवाई

राज्यात मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूरमध्ये उबरची सेवा सुरू आहे.  या चार शहरांमध्ये कंपनीच्या कॅब चालकांच्या बँक खात्यात हा निधी   जमा करण्यात येत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. पुणे आणि परिसरात उबरचे सुमारे 20 हजार कॅब चालक असावेत, असा अंदाज आहे. ड्रायव्हर फंडमध्ये मदत करावी म्हणून देशातील अनेक उद्योग समूह, वाहतूक क्षेत्राशी संबंधित कंपन्या यांनाही आवाहन करण्यात आले आहे, असेही परमेश्वरन यांनी सांगितले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus Uber support Cab driver who found in financial crisis

Tags
टॉपिकस