Coronavirus : डिजीटल पासची मागणी करणारा निघाला 'आयसोलेशन'मधील व्यक्ती!

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 12 April 2020

पोलिस उपायुक्त (गुन्हे) बच्चन सिंग यांच्या देखरेखीखाली संचारबंदी कालावधीत नागरिकांना अडचण येऊ नये, यासाठी डिजीटल पास यंत्रणा सुरू करण्यात आली.

पुणे : संचारबंदी कालावधीत घरी जाण्यासाठी पुणे पोलिसांकडे डिजिटल पासची मागणी करणाऱ्याचा पोलिसांना संशय आल्याने त्यांनी स्थानिक पोलिसांकडे संपर्क साधला. स्थानिक पोलिसांनी पडताळणी केल्यानंतर संबंधित व्यक्तीला कोरोनामुळे विलगीकरण केल्याचे निदर्शनास आले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे एक मोठी दुर्घटना टळली.

- Coronavirus : २४ तासांत ९०९ नव्या केसेस; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव म्हणाले...!

पोलिस उपायुक्त (गुन्हे) बच्चन सिंग यांच्या देखरेखीखाली संचारबंदी कालावधीत नागरिकांना अडचण येऊ नये, यासाठी डिजीटल पास यंत्रणा सुरू करण्यात आली. डिजीटल पास कक्षाकडे एका व्यक्तीने फोनद्वारे संपर्क साधला. आपण डिजीटल पास मिळविण्यासाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण केली आहे, मात्र आपल्याला अद्याप पास मिळाला नसल्याचे त्याने सांगितले.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

डिजीटल कक्षातील पोलिस अधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्तीकडे पास देण्यासाठीचे कारण विचारले, तेव्हा त्याने "आपण चंदननगर येथील एका कंपनीमध्ये असून कोरोनामुळे माझे विलगीकरण करण्यात आले आहे, माझा विलगीकरण कालावधी संपला आहे, आता मला घरी जायचे आहे," असे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्यास कोरोनामुळे विलगीकरण केलेल्या व्यक्तीला सोडण्याची परवानगी आम्ही देऊ शकत नाही, असे समजवाले.

- Fight with Corona : ब्रिटीश पंतप्रधानांनी कोरोनाला हरविले; हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज!

तरीही त्याच्याकडून सोडण्याबाबत विनंती केली जात होती. त्यामुळे पोलिसांनी चंदननगर पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिस संबंधित ठिकाणी जाऊन चौकशी केली. तेव्हा, डिजीटल परवानगी मागणाऱ्या व्यक्तीचा विलगीकरण कालावधी अद्याप संपला नसल्याची माहिती पोलिसाना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित व्यक्तीला बाहेर न पडण्याच्या सूचना देऊन डिजीटल कक्षाला सविस्तर माहिती दिली.

- अशा खडतर परिस्थितीत सरकारला मदत करायला तयार : रघुराम राजन

पोलिसांनी तत्काळ या प्रकारची दखल घेऊन पाहणी केल्याने पुढील दुर्घटना टळली, अशी माहिती पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Person who demand for a digital pass is isolated due to corona