Corona Virus : लॉकडाऊमुळे भुकेलेल्यांसाठी धडपडतेय कोथरुडचे साठे दाम्पत्य

Sathe Family distributing food to Hungry person in Pune during lockdown
Sathe Family distributing food to Hungry person in Pune during lockdown

बावधन(पुणे) : लॉकडाऊनमुळे पुण्यातील अनेक निराधार कुटूंबे, मोलमजूर, विद्यार्थी यांना स्वयंसेवी संस्थामार्फत अन्नदान केले जात आहे. अशातच कर्वेनगर येथील संगीता आणि शशिकांत किसन साठे हे दाम्पत्य मानवतेच्या भावनेतून तब्बल २७५ भुकेलेल्यांची भूक आहेत. दररोज  हे दाम्पत्य आणि त्यांची दोन्ही मुले दुसऱ्यांची भूक शमविण्यासाठी धडपडत आहेत. साठे दाम्पत्याच्या अन्नदानाचा दानशूरपणा कोथरूड परिसरात सध्या कौतुकाचा विषय झाला आहे.

लॉकडाऊन असताना पिकअप, टेम्पो घेऊन जात होता कामगारांना; पोलिसांनी पकडले अन्...

अवघे बारावीपर्यंत शिकलेले शशिकांत मूळचे कुळे (ता.मुळशी) येथील आहेत. उपजिविकेसाठी तेवीस वर्षापूर्वी ते पुण्यात आले. 
सुरूवातीला हॉटेलमध्ये काम केल्यानंतर प्रपंचासाठी संघर्ष करीत 2005 पासून साहिल केटरींग नावाने व्यवसाय सुरू केला. दहावी शिकलेल्या पत्नी संगीता आणि शशिकांत दोन सॉफ्टवेअर कंपन्या आणि दोन शाळांना रूचकर जेवण देतात. कोरोनामुळे शाळा, कंपन्यांना सुटी असल्यामुळे शशिकांत शांत होते.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन झाल्याने हॉटेल, खानावळी बंद आहेत. त्यामुळे अभ्यासासाठी दूरवरून आलेले विद्यार्थी, होतावर पोट असणाऱ्या मोलमजूरांचे हाल होवू लागले. देवळाबाहेर बसलेले भिकारी, निराधार कुटूंबे यांची उपासमार होवू लागली. हे दृश्य पाहून शशिकांत यांचे काळीज पिळवटले. त्यांनी पत्नीला सांगून निराधारांना जेवण देण्याचा निश्चय केला. त्यासाठी मार्केटयार्डवरून पन्नास हजार रूपयांचा एकदम माल भरला.

 Coronavirus : कर्तव्यावर असतानाच पोलिस देतायेत गरजूंना जेवणाचा डबा 

 शुक्रवारपासून (20 मार्च) हे दाम्पत्य दुपारी सुमारे पंचाहत्तर आणि रात्रीच्यावेळी दोनशे भुकेलेल्यांना जेवण पुरवितात. दोघेही पहाटे उठून जेवणाचे नियोजन व तयारी करतात. मुले साहिल आणि श्रृती देखील आई बाबांची या कामात मदत करतात. चार पुऱ्या, भाजी, पुलाव किंवा मसालेभात, पापड, लोणचे आदी भरून त्याची पाकीटे तयार करतात. 

 Coronavirus : वाहतूक शाखेकडून रिक्षांना मिळतेय परवानगी; पण...   

दुपारी एकच्या सुमारास नळस्टॉप, मृत्यूंजय मंदीर तसेच वारजे पुलाखाली बसलेल्या निराधार गरजूंना जेवणाची पाकीटे वाटतात. तर रात्रीच्यावेळी त्यांच्या घरून सुमारे दोनशे गरजू जेवणाची पाकीटे घेवून जातात. वाटपावेळी कोरोनाच्या संसर्गाची बाधा होवू नये यासाठीही त्यांनी योग्य ती काळजीही घेतली आहे. जेवणाच्या एका दिवसासाठी त्यांचा सर्वसाधारण नऊ हजार रूपये खर्च होतो. जेवणाअभावी कुणी उपाशी राहत असेल तर त्यांनी 9623311557 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.
  
''भूक लागल्यानंतर काय अवस्था होते हे मी जवळून अऩुभवले आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत कुणी उपाशी राहू नये ही आम्हा कुटूंबाची तळमळ आहे. या तळमळीतूनच भुकेलेल्यांना जेवण पुरवित आहे. माझे अराध्य दैवत मेडजाई आणि काळभैरवनाथाच्या कृपेने जोपर्यंत क्षमता आहे तोपर्यंत हा उपक्रम चालू ठेवणार आहे.''
- शशिकांत साठे (कर्वेनगर)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com