पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी तीन नवीन पाॅझिटिव्ह; आकडा पोहचला 29 वर

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 11 April 2020

कोरोना संसर्ग झालेले पहिले तीन रुग्ण 11 मार्च रोजी वायसीएममध्ये दाखल झाले होते. त्यांचे एन आय व्हीकडील अहवाल 12 मार्च रोजी पाॅझिटीव्ह आले होते. या घटनेला आज 30 दिवस पूर्ण झालेत आणि पाझिटिव्ह रुग्णांची संख्या 29 झाली आहे

पिंपरी : कोरोना संसर्ग झालेल्या शहरातील रुग्णांमध्ये गेल्या सोळा तासात तिघांची भर पडली आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 29 झाली आहे. त्यातील 12 जण बरे होऊन यापुर्वीच घरी पोचले आहेत. दरम्यान, शहरातील पाॅझिटीव्ह व्यक्तींची संख्या गेल्या पाच-सहा दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे. चार एप्रिल रोजी रात्री पाच जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला होता. त्यामुळे उपचार घेत असलेल्यांची संख्या आठ झाली होती. त्यात गेल्या पाच दिवसात तब्बल नऊने वाढ झाली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
30 दिवसात 29
कोरोना संसर्ग झालेले पहिले तीन रुग्ण 11 मार्च रोजी वायसीएममध्ये दाखल झाले होते. त्यांचे एन आय व्हीकडील अहवाल 12 मार्च रोजी पाॅझिटीव्ह आले होते. या घटनेला आज 30 दिवस पूर्ण झालेत आणि पाझिटिव्ह रुग्णांची संख्या 29 झाली आहे. 

Coronavirus : कोरोनासाठी पुण्यात स्वतंत्र रूग्णालय; सरकारचा प्रस्ताव

प्रशासनाची कठोर पावले
शहरात पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. चिखली घरकुल, खराळवाडी, थेरगाव पडवळनगर,  दिघी हे भाग मंगळवारपासून सील केले. गुरुवारी मध्यरात्रीपासून भोसरीतील काही भाग सील केला. त्यात शुक्रवारी वाढ करण्यात आली.

खासदार, आमदारांच्या ॲम्ब्युलन्स ताब्यात घ्या ! 

भोसरी, दिघी, थेरगाव सीलक्षेत्र वाढवले
महापालिका व पोलिस प्रशासनाने शुक्रवारी (ता. 10) रात्री अकरापासून भोसरी, दिघी व थेरगाव भागात सील केलेल्या परिसराचे क्षेत्र वाढविले. पुढील आदेश येईपर्यंत हा भाग बंद ठेवण्यात आला आहे. 

Corona Virus : कोरोनामुळे पुणे विद्यापीठ सील 

 भोसरी गावठाण : चांदणी चौक,  मुख्य रस्ता, मॅन्जुनिअस केक शाॅप, मेघनाद सोनोग्राफी केंद्र, लांडेवाडी रस्ता, कर संकलन कार्यालय, गव्हाणे चौक, लोंढे गिरणी, विनय सुपर मार्केट, तुळजाभवानी मंदिर, मारुती मंदिर, क्रांतिवीरनगर.

थेरगाव गावठाण : रहाटणी लिंक रस्ता, स्वस्तिक डायमंड अपार्टमेंट, आस्था मेडिकल, हाॅटेल सिल्वर नाईन रस्ता, आॅरा सोसायटी. तसेच, डांगे चौक- बिर्ला हाॅस्पिटल- तापकीर चौक- काळेवाडी फाटा - डांगे चौक.

दिघी गावठाण : स्कायलाइन सोसायटी, हाॅटेल द्वारकाधीश, ओम सुपर मार्केट, फेज थ्री रस्ता, ओम साई नर्सरी, श्रीसाई हाॅस्पिटल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three more new positives in Pimpri Chinchwad and total Count reached 29