esakal | कोरोनामुळं नोकऱ्या जाणार; 'या' क्षेत्राला बसणार सर्वाधिक फटका
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus impact 50 million jobs at risk tourism aviation industry

जगात सगळ्याच कंपन्यांना कोरोना व्हायरसचा दणका बसत असला तरी, पर्यटन व्यवसायाला या परिस्थितीचा सर्वांत मोठा फटका बसणार असल्याचं दिसत आहे.

कोरोनामुळं नोकऱ्या जाणार; 'या' क्षेत्राला बसणार सर्वाधिक फटका

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

Coronavirus:जगभरात कोरोनानं थैमान घातलंय. चीनमधील हुबेई प्रांतात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळळा होता. त्या हुबेई प्रांतातील वुहान शहरात कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी, गेल्या दीड-दोन महिन्यात कोरोना जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. भारतात आता कोरोनाचे रुग्ण 100च्या पुढे गेले आहेत. या सगळ्याचा परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवर होताना दिसत आहे. जगातील सर्वच शेअर बाजारांनी आपटी खाल्ली आहे. विमान कंपन्या, पर्यटन व्यवसाय आणि त्यावर आधारीत इतर व्यवसाय अडचणीत आले आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पर्यटकांचे व्हिसा रद्द
जगात सगळ्याच कंपन्यांना कोरोना व्हायरसचा दणका बसत असला तरी, पर्यटन व्यवसायाला या परिस्थितीचा सर्वांत मोठा फटका बसणार असल्याचं दिसत आहे. सध्या भारताचा विचार केला तर, अनेकांनी आपल्या परदेश पर्यटनाचे प्लॅन रद्द केले आहेत. त्याच प्रमाणे युरोपातील किंवा कोरोना प्रभावीत देशांमधील पर्यटकांना भारताने बंदी केली आहे. येत्या 15 एप्रिलपर्यंत पर्यटकांना देण्यात आलेले व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळं भारताच्या पर्यटन व्यवसायालाही मोठा दणका बसणार आहे. जगभरात अनेक विमानांचं उड्डाण रद्द करण्यात आलंय. आलिशान क्रूझ शीप बंदरांवर पडून आहेत. त्यामुळं पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. जगात एकूण पाच कोटी कर्मचाऱ्यांना नोकऱ्या गमवाव्या लागण्याची शक्यता आहे. वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम कौन्सलनं ही माहिती दिली आहे. पर्यटन क्षेत्रातील कंपन्या किती दिवस कोणत्याही मिळकती शिवाय स्वतःला आणि कंपनीतील कर्मचाऱ्यांना सांभाळू शकतात. यावर बरचं काही अवलंबून आहे. ग्राहक पर्यटनाचे नियोजन रद्द करत असल्यामुळं कंपन्यांची अडचण होत आहे. निश्चितपणे पर्यटन व्यवसायाला फटका बसेल, असे कौन्सिलच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.

आणखी वाचा - कोरोना व्हायरसचा बॉलिवूडवर असा झाला परिणाम

आणखी वाचा - साताऱ्यात कोरोनाचा पहिला संशयित सापडला

क्रूझचा बिझनेस भूईसपाट
कौन्सिलच्या आकडेवारीनुसार जगात 2018मध्ये 3 कोटी 19 लाख लोकांना थेट पर्यटन व्यवसायात रोजगार मिळाला होता. त्यातील 16 टक्के रोजगारावर आता टांगती तलवार आहे. सध्या चीनच्या पर्यटन उद्योगावर अवलंबून असणारे अनेक उद्योग अडचणती आले आहेत. मुळात गेल्या काही वर्षांतील ते सर्वांधिक उलाढाल होणारे क्षेत्र आहे. काही देशांनी कोरोना व्हायरसच्या धास्तीमुळं क्रूझन आपल्या देशात प्रवेश दिला नाही. जपानने डायमंड क्रूझ शिपमधील प्रवाशांना जपानमध्ये प्रवेश दिला नाही. हा विषय जगभरात चर्चेला होता. त्यामुळं गेल्या दोन महिन्यांत क्रूझचा बिझनेस भूईसपाट झालाय. दरम्यान, जगातील पर्यटन उद्योगाला अशा धक्क्यांची सवय असून, त्यातून कव्हर व्हायला किमान 10 महिने लागतील, असे सांगितले जात आहे.

काय झाले? काय होणार?

  • जगभरात पर्यटकांकडून बुकिंग्ज रद्द
  • अनेक देशांनी पर्यटन व्हिसा रोखले
  • परिणामी एअरलाईन्सची बुकिंग्जही रद्द
  • पर्यटन क्षेत्राचा परिणाम एअरलाईन्स कंपन्यांवरही
  • एअरलाईन्स कंपन्याही अडचणीत; कामगार कपातीचा धोका
  • पर्यटन आणि एअरलाईन्स कंपन्यांमधील नोकऱ्या धोक्यात
  • पर्यटनाचे केंद्र असलेल्या शहरांमधील हॉटेल्स, रेस्टॉरंट्सही अडचणीत
loading image
go to top