राज्यात १५ नवीन रुग्ण : टोपे 

rajesh tope
rajesh tope

मुंबई  - राज्यात काल १५ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी ११ जण मुंबईतील, तर प्रत्येकी एक रुग्ण पुणे, ठाणे, वसई विरार आणि नवी मुंबई भागातील आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ८९ झाली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल येथे दिली. 

मुंबई आणि परिसरात आढळलेल्या १४ नवीन रुग्णांपैकी ९ जण हे यापूर्वीच्या कोरोनाबाधित रुग्णांचे निकटसहवासित आहेत. इतर पाच जणांनी दुबई, मलेशिया, थायलंड, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आदी देशात प्रवास केल्याचा इतिहास आहे, अशी माहितीही टोपे यांनी दिली. १३ मार्चला कस्तुरबा रुग्णालयात भरती झालेल्या ५९ वर्षीय फिलिपिनी नागरिकाचा काल रात्री हिरानंदानी रुग्णालयात मृत्यू झाला. सुरुवातीला कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या या रुग्णाचे नंतरचे दोन नमुने कोरोनाकरिता निगेटिव्ह आले होते. म्हणजे त्याचा कोरोनो हा आजार बरा झाला होता. मात्र, त्याला असलेल्या मधुमेह आणि अस्थमा या आजारांमुळे झालेल्या गुंतागुंतीत त्याचा मृत्यू झाला. हा मृत्यू कोरोनामुळे झालेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यात आज परदेशातून आलेले २५५ प्रवासी सर्वेक्षणाखाली दाखल झाले आहेत. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी १८८९ जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले आहेत. 

शहरे आणि रुग्ण 
पिंपरी चिंचवड : १२ 
पुणे : १६ 
मुंबई : ३५ 
नवी मुंबई : ५ 
नागपूर, यवतमाळ, कल्याण : प्रत्येकी ४ 
नगर, ठाणे : प्रत्येकी २ 
पनवेल, उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी, वसई विरार : प्रत्येकी १

एकूण रुग्ण ८९ मृत्यू २  


आरोग्य खात्यामार्फत आवाहन 
- पुणे आणि मुंबईमध्ये काही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेले असले तरी, या भागातून येणाऱ्या लोकांबद्दल विनाकारण भीती बाळगण्याचे कारण नाही. 
- आरोग्य सेवा तसेच तातडीची वैद्यकीय सेवा जनतेला मिळणे आवश्यक असल्याने कोणीही ओपीडी अथवा इतर आरोग्य सेवा बंद ठेवू नयेत. 
- स्थानिक प्रशासनाने होम क्वारंटाइन व्यक्तींच्या यादीनुसार त्या व्यक्ती सूचनांचे पालन करत आहे किंवा नाही, याची खातरजमा करावी. 

राज्य नियंत्रण कक्ष ०२०/२६१२७३९४ टोल फ्री क्रमांक १०४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com