Coronavirus : कोरोनाच्या सामन्यासाठी भारत सरकारचा मोठा निर्णय!

वृत्तसंस्था
गुरुवार, 19 मार्च 2020

भारत सरकारनेही कोरोनाचा प्रादूर्भाव वाढण्यापूर्वीच काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. केंद्र सरकारने ३६ देशांच्या नागरिकांना भारतात येण्यासाठी काही काळासाठी बंदी करण्यात आली आहे. 

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे जग ठप्प झालेलं असतानाच सर्व देश आपापल्या परीने कोरोनाशी लढा देत आहेत. चीनमधील दैनंदिन जीवनच संपवून टाकलेल्या कोरोनाने आतापर्यंत जगात जवळपास ९ हजार बळी घेतले आहेत. त्यामुळे सर्वच देशांनी मोठ्या प्रमाणात खबरदारी घेत कोरोनाच्या विळख्यातून बचावासाठी उपाययोजना केल्या आहेत. भारत सरकारनेही कोरोनाचा प्रादूर्भाव वाढण्यापूर्वीच काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. केंद्र सरकारने ३६ देशांच्या नागरिकांना भारतात येण्यासाठी काही काळासाठी बंदी करण्यात आली आहे. 

कोरोनाला घाबरू नका; प्रत्येकाने काळजी घ्या! 

भारतात कोरोनाचे आतापर्यंत ३ बळी गेलेल असून, कोरोनाग्रस्तांची संख्या १५४ झाली आहे. तसेच दररोज कोरोनाबाधित रूग्णांची भर सर्वच राज्यात पडत आहे. तसेच कोरोनाबाधित रूग्णांमध्ये २५ परदेशी नागरिक असल्याचीही माहिती समोर आली आहे. बळींची संख्या कमी असली तरी, कोरोनाचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यातही जे भारतीय परदेशातून परतले आहेत, अशाच नागरिकांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आता जगातील इतर कोरोना प्रभावित ३६ देशांमधून नागरिकांना भारतात येण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तर यातील ११ देशांमधून आलेल्या नागरिकांना यापूर्वीच विलगीकरण कक्षात ठेवण्यात आल्याची माहिती गृहमंत्रालयाने दिली आहे. 

 आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

या देशांतून नागरिक भारतात येऊ शकत नाहीत -
ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, बल्गेरिया, क्रोशिया, सायरस, झेक रिपब्लिक, डेन्मार्क, एस्टोनिया, फिनलँड, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, आईसलँड, हंगेरी, आर्यलंड, इटली, लॅटिव्हिआ, लिंचेस्टिंन, लिथुनिआ, लक्झबर्ग, माल्टा, नेदरलँड, नॉर्वे, पोलंड, पोर्तुगाल, रोमानिया, स्लोव्हाकिया, सोलव्हेनिआ, स्पेन, स्विडन, स्विझर्लंड, तुर्के, युके यासह ३६ देशातून येणाऱ्या नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. १२ मार्चच्या रात्रीपासून या निर्णयाची अमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India Banned Temporarily The Entry Of Passengers From 36 Countries due to corona