IndVSWestIndies: विंडिजनं भारताला धू धू धुतलं; भारताला किती धावाचं टार्गेट?

टीम ई-सकाळ
Friday, 6 December 2019

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आजपासून सुरू झालेल्या टी-20 मालिकेत विंडिजच्या फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली. विंडिजच्या संघाला कमी लेखण्याची सूक करू नका, असा मेसेजच त्यांनी आजच्या फलंदाजीतून दिलाय.

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आजपासून सुरू झालेल्या टी-20 मालिकेत विंडिजच्या फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली. विंडिजच्या संघाला कमी लेखण्याची सूक करू नका, असा मेसेजच त्यांनी आजच्या फलंदाजीतून दिलाय.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

विंडिजची सलामी जोडी फोडण्यात चहरला यश आलं. धावफलकावर 13च धावा असताना त्यान्ं सिमॉन्सला रोहित करी झेलबाद केलं. त्यानंतर ई लुईस आणि बीए किंग यांनी जम बसवत विंडिजला 64धावसंख्येपर्यंत नेऊन ठेवलं होतं. वॉशिंग्टन सुंदरनं लुईसला एलबीडब्लू पकडलं (17 चेंडूत 40धावा) तर किंगला जडेजानं चकवलं. रिषभ पंतनं त्याला यष्टिचित केलं. युजवेंद्र चहलं कॅप्टन पोलार्डला (19 चेंडूत 37 धावा) बोल्ड केलं. तर, त्याच्याच चेंडूवर रोहित शर्मानं हेडमायरचा कॅच घेतला. विंडिजच्या फलंदाजीत हेटमायरचं अर्धशतक साजरं केलं असलं तरी. प्रत्येक फलंदाजानं आपलं छोटं छोटं योगदान दिलं. त्यामुळं संघाची धावसंख्या निर्धारीत 20 षटकांत 206 धावा केल्या. विंडिजकडून एकूण 15 षटकार खेचण्यात आले. त्याच 15 चेंडूंवर 90 धावा झाल्या. त्यामुळं भारतापुढं षटकामागे दहा पेक्षा जास्त धावा करण्याचं कडवं आव्हान उभं राहिलंय. 

कुस्तीगीर परिषदेचा आखाडाही शरद पवारांनीच जिंकला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india vs west indies t20 hyderabad first match updates