कुस्तीगीर परिषदेचा आखाडाही शरद पवारांनीच जिंकला! 

टीम ई-सकाळ
Thursday, 5 December 2019

राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

पुणे : महाराष्ट्रात गेले तीन महिने एक कुस्ती गाजली. कोण तेल लावलेला पैलवान तर, कोण कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष! राजकारणाच्या आखाड्यातील ही कुस्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जिंकली आहे. आता त्यांनीच सांगितलेल्या कुस्तीगीर परिषदेवर ते पुन्हा निवडून आले आहेत. राज्य कुस्तीगीर परिषदेच्या गेल्या अनेक वर्षांच्या इतिहासात प्रथमच अध्यक्षपद वगळता सर्व जागांसाठी निवडणूक घेण्यात आली.

डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

कशी झाली निवडणूक?
राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्याचवेळी सरचिटणीसपदासाठी बाळासाहेब लांडगे पुन्हा निवडून आले. राज्यातील कुस्तीमध्ये बदल घडवून आणण्यासाठी एकत्रित आलेल्या मल्लांनी परिवर्तन पॅनेलची आघाडी निर्माण केली होती. मात्र, त्यांना बाळासाहेब लांडगे यांच्या पॅनेलकडून पराभव पत्करावा लागला. परिषदेच्या प्रतिष्ठेच्या सरचिटणीसपदासाठी बाळासाहेब लांडगे कोल्हापूर, ललित लांडगे पिंपरी चिंचवड विभागातून उभे राहिले होते. त्यांना पुणे जिल्ह्याच्या संदीप भोंडवे यांचे आव्हान होते. या तिरंगी लढतीत बाळासाहेबांनी ललित आणि संदीप भोंडवे यांचा पराभव केला.

उद्धव ठाकरे चैत्यभूमीवर जाणार की नाही? काय खरं काय खोटं?

कोण हजर? कोण गैरहजर?
निवडणुकीत एकूण 90 सदस्यांना मतदान करायचे होते. यात चार गैरहजर राहिले, तर एक मत बाद झाले. लांडगे यांना 50, तर भोंडवे यांना 38 मते पडली. निवडणुकीत कार्याध्यक्षपदासाठी नामदेव मोहिते यांनी वर्ध्याचे विद्यमान खासदार रामदास तडस यांचा पराभव केला. उपाध्यक्षपदासाठी विलास कथुरे यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. खजिनदारपदासाठी अर्जुन पुरस्कार विजेत्या काका पवार यांना सुरेश पाटील यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. निवडणूक भोसरीत रोशन गार्डन येथे पार पडली. निवृत्त न्यायाधीश शि. ना. सरदेसाई यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. 

म्हणून, पुण्यातील बैठकीला उद्धव ठाकरे अनुपस्थित राहणार!

राज्य कुस्तीगीर परिषदेची कार्यकारिणी 
अध्यक्ष ः शरद पवार, कार्याध्यक्ष ः नामदेव मोहिते, उपाध्यक्ष ः धवलसिंह मोहिते पाटील, हनुमंत गावडे, दयानंद भक्त, गणेश कोहळे, संभाजी वरुटे, सर्जेराव शिंदे, सरचिटणीस ः बाळासाहेब लांडगे, खजिनदार ः सुरेश पाटील, तांत्रिक चिटणीस ः बंकट यादव, विभागीय चिटणीस ः अशोक माने, सुनील चौधरी, भरत मेकाले, वामन गाते, मारुती आडकर, सदस्य ः आत्माराम वाघिरे, अमृत भोसले, अनिल पांडे, भगतसिंग गाडीवाले, भरत कुदळे, दिलीप महाजन, हिरामण वाघ, हणुमंत गावजे, मुरलीधर टेकुलवार, प्रल्हाद आळणे, पंढरीनाथ ढोणे, रामदास शहारे, रुपेश चौधरी, राजेंद्र गोतमारे, सुनील देशमुख, शाम काबुलीवाले, सुभाष ढोणे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sharad pawar become Uninterrupted president wrestling association of maharashtra