काय म्हणावं या पोरांना! रस्त्यावरून जाणाऱ्यांना विवस्त्र करून काढले व्हिडिओ

स्वत:च्या आनंदासाठी रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना अडवून त्यांना विवस्त्र करणे, अनैसर्गिक गोष्टी करण्यास भाग पाडल्याप्रकरणी सहाजणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी गावठी पिस्तुल, गुप्ती, चार मोबाइल, दोन दुचाकी जप्त केल्या आहेत.
video shutting
video shuttingesakal
Updated on

सोलापूर : स्वत:च्या आनंदासाठी रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना अडवून त्यांना विवस्त्र करणे, अनैसर्गिक गोष्टी करण्यास भाग पाडल्याप्रकरणी सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी गावठी पिस्तुल, गुप्ती, चार मोबाइल, दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. या प्रकरणी जोडभावी पेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

video shutting
'या' तारखेपासून हॉटेल-नाट्यगृहं होणार पूर्ण क्षमतेने सुरु : टोपे

घटनेची हकीकत अशी, जुना तुळजापूर नाका ते रुपाभवानी मंदिर या रस्त्यावर विकृत प्रकाराची खबर पोलिसांना मिळाली. शुक्रवारी (ता.4) जोडभावी पेठ पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख पोलिस उपनिरीक्षक केतन मांजरे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन सागर अरुण कांबळे (रा. न्यु बुधवार पेठ, भिम विजय चौक), बुध्दभूषण नागसेन नागटिळक (रा. न्यु बुधवार पेठ, आंबेडकर उद्यानजवळ), सतीश उर्फ बाबुला अर्जुन गायकवाड (रा. मिलिंद नगर, बुधवार पेठ) आणि अक्षय प्रकाश थोरात (रा. मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर, न्यु बुधवार पेठ) यांना अटक केली. सागरचे शिक्षण बी-कॉम (द्वितीय वर्ष) झाले असून तो मजुरी करतो. उर्वरित तिघांमध्ये एक दहावी उत्तीर्ण, एक नववी नापास आणि एकाचे बीए-भाग एक असे शिक्षण झाले असून त्यातील दोघे खासगी ड्रायव्हर म्हणून जॉब करतात तर एकाचा मंडप व्यवसाय आहे. त्यांनी रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांना अडवून जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांचे बिभत्स व्हिडिओ तयार केले. ते व्हिडिओ एकमेकांच्या मोबाईलवरही शेअर केले.

video shutting
CBSE: दहावी,बारावीच्या परीक्षा ऑफलाईन; तारीख जाहीर

गुरुवारी (ता.10) त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. ही कारवाई सहायक पोलिस आयुक्‍त डॉ. संतोष गायकवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळासाहेब भालचिम, पोलिस निरीक्षक विजयालक्ष्मी कुर्री यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मांजरे, पोलिस हवालदार आबा थोरात, पोलिस नाईक सुरेश जमादार, अतुल गवळी, खाजप्पा आरेनवरू, राजेश घोडके, स्वप्निल कसगावडे, गोपाळ शेळके, दत्ता काटे, सुहास गायकवाड यांच्या पथकाने केली.

video shutting
Nitesh Rane: राणेंना जामीन देताना कोर्टाने घातल्या 'या' अटी

भिकाऱ्याला अडवून विकृत कृत्य करायला भाग पाडले
एकाला दमदाटी व मारहाण करून त्याच्याकडील पिस्तुल पळविल्याचे संशयित आरोपींनी सांगितले. दरम्यान, त्या चौघांनी आनंद घेण्याचा अनोखा प्रकार केला, ती एक विकृतीच आहे. परराज्यातील पायी जाणारे काही मजूर, तृतीयपंथी, भिकारी, रस्त्यालगत झोपलेल्यांना त्यांनी त्रास दिला. एका भिकाऱ्याला अडवून विकृत कृत्य करायला भाग पाडले. तर रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या भिकाऱ्यांना विवस्त्र करून पावडर लावून नाचायला लावले. रस्त्यालगत झोपलेल्याच्या गळ्यात पुष्पाहार घालून तो मयत झाला म्हणून त्याच्याजवळ रडत बसणे, असे प्रकार त्यांनी केले. हे सगळे प्रकार त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून रेकार्ड केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com