

Husband Killed Wife
esakal
बंगळूर: कौटुंबिक वादातून पत्नीची गळा आवळून हत्या करून तिचा मृतदेह बेडशिटमध्ये गुंडाळून पसार झालेल्या पतीला कुंबळगोडू पोलिसांनी बिहारमधून अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव धीरजकुमार (वय २४) असून, तो बिहारचा रहिवासी आहे. त्याने २७ जुलै रोजी गेरुपाळ्य परिसरात राहणाऱ्या पत्नी रीमाकुमारी (२०) हिची हत्या करून पलायन केले होते. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष पथकाने बिहारमध्ये छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.