

Crime News
esakal
छत्रपती संभाजीनगर: पती सोबतच्या अनैतिक संबंधातून पत्नीने संबंधित महिलेला तंबी देत माझ्या नवऱ्याचा नाद सोड म्हणत खडसावले. याचाच राग मनात ठेवून प्रियकराच्या पत्नीची थेट घरात घुसून चाकूने हत्या केल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या बजाजनगर भागातील या थरारक घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. यात हल्ला झालेल्या प्रियकराच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे.