esakal | पिंपरी : इतर कोणाशी लग्न जमविल्यास मारून टाकण्याची धमकी
sakal

बोलून बातमी शोधा

 threatens

पिंपरी : इतर कोणाशी लग्न जमविल्यास मारून टाकण्याची धमकी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : ‘तुमच्या मुलीचे लग्न माझ्याशिवाय इतर कोणाशी जमवले तर त्याला आणि तुम्हालाही मारून टाकीन’ अशी धमकी देत अल्पवयीन मुलीचा पाठलाग केला. याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना चिखली परिसरात घडली.

हेही वाचा: पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण शंभर टक्के भरले

याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रवींद्र गुलचंद गायकवाड (वय ३०, रा. भक्ती हौसिंग सोसायटी, घरकुल, चिखली) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी हा गेल्या तीन वर्षांपासून फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करीत होता. 'मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, असे म्हणून आरोपी अल्पवयीन मुलीशी जवळीक साधत होता. फिर्यादी महिला व त्यांचे पती हे नातेवाईकांसह थांबले असताना आरोपी तेथे आला. फिर्यादी महिलेच्या मुलीशी मी लग्न करणार आहे.

हेही वाचा: Pimpri : रोकड लुटल्याच्या कटात कामगाराचाच सहभाग

भविष्यात हिचे लग्न जमू देणार नाही, असे आरोपी बोलला. दरम्यान, असे का बोलतोस, असा जाब फिर्यादी व त्यांच्या पतीने आरोपीला विचारला असता ‘तुम्ही तुमच्या मुलीचे लग्न माझ्याशिवाय इतर कोणाशी जमवले तर त्याला मी मारून टाकीन व तुझ्या घरच्यांनाही मारून टाकीन’, अशी धमकी देत आरोपीने शिवीगाळ केली. चिखली पोलिस अधिक तपास करीत आहेत.

loading image
go to top