esakal | इंदापूर : वालचंदनगर पोलिसांची गावठी हातभट्टीच्या अड्यावर कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

illegal alcohol

इंदापूर : वालचंदनगर पोलिसांची गावठी हातभट्टीच्या अड्यावर कारवाई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वालचंदनगर : परीसरातील नीरा नदीच्या काठावर सुरु असलेल्या हातभट्टीच्या अड्यावर वालचंदनगर पोलिसांनी छापा टाकून गावठी हातभट्टीची दारु तयार करणाऱ्यावर गुन्हा दाखल केला. याप्रकरणी जगन्नाथ बाबु अडसुळ ( वय ६५, रा.निमसाखर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा: प्रेयसीचा लग्ननास नकार; प्रियकराने मित्रांना पाठविले अश्‍लिल व्हिडीओ

वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार निमसाखर गावच्या हद्दीमध्ये नीरा नदीच्या काठावर बेकायदेशीरपणे हातभट्टी दारु बनविण्याचा उद्योग सुरु होता. निमसाखरच्या ग्रामस्थांनी गावामध्ये दारु बंदी करण्याची मागणी गेल्या दोन दिवसापूर्वी केली होती. पोलिसांनी तातडीने कारवाईचा बडगा उगारला. बुधवार (ता.१) रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास नीरा नदीच्या काठावर छापा टाकून झुडपामध्ये सुरु असलेली हातभट्टी उध्वस्त करुन ३०० लिटर हातभट्टीचे दारु नष्ट केली.

हेही वाचा: इंदापूर : समर्थकांमध्ये श्रेयवादावरुन कलगीतुरा

एका दुचाकीसह ३२ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त केला. वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक बिरप्पा लातुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अतुल खंदारे, रतीलाल चौधर,प्रवीण वायसे यांनी सहभाग घेतला. याप्रकरणी महिला पोलिस सुनिता दळवी यांनी वालचंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

loading image
go to top