Mahashivratri 2023 : दोन दिवसाच्या सलगच्या उपवासाने अॅसिडिटी झालीये? ट्राय करा हा पदार्थ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mahashivratri 2023

Mahashivratri 2023 : दोन दिवसाच्या सलगच्या उपवासाने अॅसिडिटी झालीये? ट्राय करा हा पदार्थ!

Mahashivratri Food Recipe 2023 : यंदा भागवत एकादशी आणि महाशिवरात्री दोघेही उपवास लागोपाठ आलेले आहेत. उपवास आला की सोबतच अॅसिडिटी आलीच. त्यात दोन दिवस सलग उपवास म्हणजे काही विचारायलाच नको. पण म्हणून आपण उपवास सोडू शकत नाही कारण दोघेही उपवास खूप महत्वाचे आहेत. म्हणून ट्राय करा उपवासाचे स्पेशल असे केळ्याच्या पिठाचे घावन.

केळ्याच्या पिठाचे घावन

साहित्य :

  • केळ्याचे पीठ 2 वाट्या

  • जिरेपूड 1 चमचा

  • मिरची पेस्ट - 1 चमचा

  • मीठ चवीनुसार

  • ओलं खोबरं - 2 चमचे

  • दाण्याचे कूट - 1 चमचा

  • तूप 5 ते 6 चमचे

कृती :

  • केळ्याच्या पिठात जिरेपूड, मीठ, तिखट, दाण्याचा कूट, ओलं खोबरं घाला.

  • पाणी घालून 5 मिनिटं पीठ भिजवून ठेवा.

  • आवडत असल्यास पाण्याऐवजी ताक घालून पण भिजवून ठेऊ शकता.

  • तवा गरम करून त्यावर तूप घालून या मिश्रणाचे घावन करून घ्या. दोन्ही बाजूनी परतून घ्या.

  • चटणी बरोबर सर्व्ह करा.