Aditya L1 Launch : आदित्ययानाच्या आधी मारुतीरायाने घेतली होती सूर्याकडे झेप.. या घटनेमुळे नाव मिळालं 'हनुमान'

सूर्याकडे आदित्ययानाच्या आधी मारुतीरायाने मोठी झेप घेतली होती आणि याच घटनेने त्यांना हनुमान असे नाव मिळाले होते
Aditya L1 Launch
Aditya L1 Launch esakal

Aditya L1 Launch : भारताने अवकाशातील घडामोडींचा आढावा घेण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. चांद्रयान-३ मोहिमेच्या यशानंतर भारतीयांची छाती जिथे गर्वाने फुलली तिथे काहीच दिवसांत इस्रोने आणखी एक नवा उपक्रम हाती घेतलाय. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी 'आदित्य' उपग्रहाचे आज यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. सकाळी 11:50 मिनिटांनी पीएसएलव्ही रॉकेटच्या मदतीने हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला.

सूर्याकडे आदित्ययानाच्या आधी मारुतीरायाने मोठी झेप घेतली होती आणि याच घटनेने त्यांना हनुमान असे नाव मिळाले होते. अनेकांना ही कथा कदाचित माहिती नसेल. चला तर जाणून घेऊया सविस्तर.

महाबली हनुमानाला बलशाली, शक्तीशाली देवरूपी शक्ती म्हटले जाते. हनुमानाचे फक्त नाम घेतल्याने मोठमोठी संकटे संकटेही दूर होतात असे म्हटले जाते. जे भक्त नि:स्वार्थपणे भगवान श्री रामचंद्रांचे परम भक्त भगवान हनुमान यांची उपासना करतात त्यांना कधीही कोणत्याही संकटाचा सामना करावा लागत नाही. हनुमानाचे नामस्मरण केल्याने मनुष्याला सांसारिक सुखांची प्राप्ती होते असे म्हणतात. हनुमानाला बजरंगबली, अंजनीपुत्र, पवनपुत्र, रामभक्त अशा अनेक नावांनी ओळखले जाते. मात्र बजरंगबलींचं नाव हनुमान कसे पडले हे तुम्हाला माहितीये का?

पौराणिक कथेनुसार हनुमानजींचे बालपणीचे नाव मारुती होते. एके दिवशी हनुमानजी झोपेतून उठले तेव्हा त्यांना खूप भूक लागली होती. त्यांना जवळच्या झाडावर एक लाल पिकलेले फळ दिसले. ते फळ खाण्यासाठी झाडाच्या दिशेने ते निघाले, खरे तर हनुमानजी ज्याला लाल पिकलेले फळ समजत होते ते फळ नसून सूर्य होता.

अमावस्येचा तो दिवस होता आणि राहू सूर्याला ग्रहण लावणार होते, पण सूर्यग्रहण होण्यापूर्वीच हनुमानजींनी सूर्याला गिळले. राहुला कळत नव्हते नेमके काय झाले ते? त्यांनी इंद्राकडे मदत मागितली. इंद्रदेवाला वारंवार विनंती करूनही हनुमानजींनी सूर्यदेवाला मुक्त केले नाही, तेव्हा इंद्रादेवाने वज्राने त्याच्या तोंडावर प्रहार केला, ज्यामुळे सूर्यदेव मुक्त झाले.

वज्राच्या प्रहारामुळे पवनपूत्र हमुमानजी बेशुद्ध होऊन पृथ्वीवर पडले आणि त्यांची हनुवटी वाकडी झाली. जेव्हा पवन देवतेला हे कळले तेव्हा ते खूप रागावले. त्यांच्या शक्तीने त्यांनी संपूर्ण जगात वायूचा प्रवाह रोखला, त्यामुळे पृथ्वीवरील सजीवांमध्ये भिती पसरली. (Sanskruti)

Aditya L1 Launch
Life Lesson from Lord Hanuman: जीवनात यश मिळवण्यासाठी हनुमानाकडून शिका हे गुण, अडचणी होतील दूर 

हे वादळ थांबवण्यासाठी सर्व देव पवनदेवास राग सोडून पृथ्वीवर प्राणवायूचा प्रवाह सोडण्याची विनंती करायला आले. पवनदेवाच्या प्रसन्नतेसाठी सर्व देवांनी बाल हनुमानाला पूर्वीप्रमाणेच बनवले आणि अनेक वरदानही दिले. (Science & Technology)

Aditya L1 Launch
Aditya L1 Launch : आदित्य एल-१ मोहिमेतून नेमकं काय साध्य होणार? इस्त्रोच्या वैज्ञानिकाने दिली माहिती

देवातांच्या आशीर्वादाने बाल हनुमान आणखी शक्तिशाली झाले. परंतु वज्राच्या प्रहाराने त्यांची हनुवटी वाकडी झाली, त्यामुळे त्यांचे 'हनुमान' हे नाव पडले.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com