

Angarak Yog 2026:
Sakal
Angarak Yog 2026: सर्व ग्रह वेळोवेळी भ्रमण करतात, यामुळे शुभ आणि अशुभ योग निर्माण होतात. जे सर्व राशींवर परिणाम करतात. त्यापैकी अंगारक योग आहे, जो ज्योतिषशास्त्रात तणाव आणि नकारात्मतेचे प्रतीक मानला जातो. फेब्रुवारीमध्ये तो तयार होण्याची अपेक्षा आहे. यामुळे काही राशीच्या लोकांच्या जीवनात अडचणी वाढण्याची शक्यता आहे. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजून ३३ वाजता मंगळ कुंभ राशीत भ्रमण करेल. राहू आधीच या राशीत स्थित असेल. यामुळे मंगळ आणि राहूची युती होईल, यामुळे अंगारक योग निर्माण होईल. या योगामुळे मानसिक अशांतता वाढू शकते. याचा १२ राशींपैकी कोणत्या राशींवर परिणाम होऊ शकतो हे जाणून घेऊया.