Ashadhi Ekadashi 2023 : ...अन्यथा आषाढी एकादशीला पंढरपूर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना घेराव घालणार; एसटी वर्कर्स काँग्रेसचा इशारा

एसटी कामगारांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन भत्ते व थकबाकीची मागणी प्रलंबित
Ashadi Ekadashi 2023
Ashadi Ekadashi 2023sakal

मुंबई : एसटी महामंडळाने १९९६ पासून वेतन करारात योग्य वेतनवाढ न केल्याने कामगारांचे आर्थिक नुकसान झाले आहे. करारपध्दत रद्द करून एस टी कामगारांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन, भत्ते व थकबाकीची रक्कम तात्काळ देण्यात यावी या मागणीसाठी एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) आक्रमक झाली आहे.

तातडीने यासंदर्भातील निर्णय घेऊन शासनाने कामगारांना न्याय द्यावा अन्यथा (ता.२९) रोजी आषाढी एकादशीला पंढरपूरात विठ्ठलाला साकडे घालून, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा दिला आहे.

एसटी कामगारांचे वेतन शासकिय कर्मचाऱ्यांपेक्षा अत्यंत कमी आहे. सन २०१६ ते २०२० व सन २०२० ते २०२४ हे वेतन करार अद्यापपर्यंत पूर्णत्वास आले नाही.

Ashadi Ekadashi 2023
Ashadi Ekadashi | आषाढीच्या वारीत विठूरायाला रशियन भक्तांनी घातलं साकडं

नोव्हेंबर २०२१ पासून महामंडळातील सेवाविचारात घेवून त्यांच्यामूळे वेतनात ५०००, ४००० व २५०० अशी वाढ जाहीर केलेली आहे.

त्यामुळे सेवाज्येष्ठ कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनात प्रचंड विसंगती, त्रुटी निर्माण झालेल्या आहेत. परिणामी अनियमित वेतनवाढीमुळे बहुसंख्य कामगारांवर अन्याय झाल्याने कामगारांचे वेतनातील त्रुटीमुळे आर्थिक शोषण होत आहे.

Ashadi Ekadashi 2023
Ashadi Ekadashi 2023: आषाढी एकादशीला घ्या 'या' खास पदार्थांचा आस्वाद..

सद्याच्या परिस्थितीमध्ये वर्ष २०१६ ते २०२० व सन २०२० ते २०२४ या कालावधीतील एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढीच्या करारात अपेक्षित वाढ होणे आवश्यक होते. परंतु अद्याप वेतनवाढ झाली नाही.

या मागणीचे राज्य सरकार दरबारी सुद्धा अनेक निवेदने देऊनही दाखल घेतली जात नसल्याने अखेर आषाढी एकादशी दिवशी एस.टी. कामगारांच्या मागण्यासाठी विठ्ठलाला साकडे घालण्यात येणार आहे.

तसेच सरकारला एस.टी. कर्मचा-यांच्या प्रश्नांची दखल घेण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स कॉंग्रेस (इंटक) संघटनेच्या वतीने घेराव घालण्यात येणार असल्याचे संघटनेचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com