Astro Tip: राहु केतूच्या प्रभावापासून वाचायचय? ‘ही’ दोन भांडी घरात असायलाच हवीत! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

astro tips

Astro Tip: राहु केतूच्या प्रभावापासून वाचायचय? ‘ही’ दोन भांडी घरात असायलाच हवीत!

राहु केतूच्या प्रभावापासून बचाव करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात अनेक उपाय सांगितले आहेत. कोणी हवन करण्यास सांगतात तर कोणी गायीला चारा घालण्यास सांगतात. पण, राहु केतूचा वाईट प्रभाव पडू नये यासाठी आपल्या घरातील दोन भांडी आपल्याला मदत करू शकतात. आपल्या स्वयंपाकघरात कढई आणि तवा जास्त वापरला जातो. कढई आणि तवा हे राहू केतू या ग्रहांचे प्रतिनिधित्व करतात, असे वास्तुशास्त्र सांगते.

या भांड्यांची खास काळजी घ्यावी असे, ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित कृष्णकांत शर्मा सांगतात.

हेही वाचा: Astro Tips : 'या' रंगांचे बूट वापरणे टाळा; नाहीतर नकारात्मकता करेल परिणाम

पंडित शर्मा यांच्यामते, तवा नेहमी अशा जागी ठेवा जिथे कोणत्याही बाहेरील व्यक्तीची नजर त्याच्यावर पडणार नाही. तसेच, वापरून झाल्यावर तवा आणि कढई कधीही पालथी ठेऊ नये. शास्त्रानुसार, अन्न शिजवताना तवा आणि कढई आपल्या गॅसच्या उजव्या बाजूस ठेवावेत. उजव्या बाजूस माता अन्नपुर्णेचा वास असतो, असा समज आहे.

तवा वापरून झाल्यावर कधीही गॅसवर तसाच ठेऊ नका. असे, केल्याने घरात नकारात्मक उर्जा पसरते. जेवण बनवून झाल्यावर भांडी थंड करून घासून स्वच्छ करून ठेवावीत. कधीही गरम तव्यावर किंवा कढईवर पाणी शिंपडू नये. असे केल्याने घरातील सदस्यांवर अनेक अडचणी येऊ शकतात.

हेही वाचा: Astro Tip : या दिवशी कर्ज घेणं पडेल महागात ; परतफेड करणं होईल अशक्य !

या भांड्यांचा उपयोग करण्याआधी त्यावर थोडे मीठ शिंपडावे. यामुळे घरातील वास्तूदोष निघून जातील. घरात सुख शांती रहावी यासाठी तव्यात बनवलेली पहिली चपाती गायीसाठी बाजूला काढून ठेवावी.

Web Title: Astro Tip Two Pots Will Save You From Rahu Ketu Negative Effects Read Story

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :AstrologySanskruti