Astro Tips About Saturday : सावधान! शनिवारी या गोष्टी दान करणं ठरू शकतं घातक...

हिंदू धर्मात प्रत्येक वार हा आपल्या ग्रहांवरून ठरवला आहे
Astro Tips About Saturday
Astro Tips About Saturdayesakal

Astro Tips About Saturday : हिंदू धर्मात प्रत्येक वार हा आपल्या ग्रहांवरून ठरवला आहे, त्या त्या वारी त्या त्या ग्रहाची पूजा केल्याने आपल्या आयुष्यात कधीही विघ्न येत नाही असं म्हणतात.शनिवार हा शनी ग्रहासाठी समर्पित आहे, त्यात शनि देवांचा कोप कोणालाही परवडत नाही त्यामुळे सगळेच आपल्या पत्रिकेत शनि वक्री होऊ नये म्हणून प्रयत्न करत असतात.

Astro Tips About Saturday
Kashid Beach : एका रोमांचक अशा शांत ठिकाणी फिरायला जायची इच्छा आहे? या ठिकाणी प्लॅन करू शकता

अनेक लोकं दर शनिवारी शनि मंदिरात जातात त्यांना तेल वाहतात, उपवास करतात, पण अजाणतेने त्यातही या चुका केल्याने त्यांच्यावर कोप होतो. शनिवारी चुकूनही या गोष्टी दिल्याने आपल्या राशीतले ग्रह वक्री होऊ शकतात. बघुयात याविषयी ज्योतिषतज्ञ श्री. शिरीष कुलकर्णी काय म्हणतात.

Astro Tips About Saturday
Health News : भरड धान्य खा, अन्‌ प्रतिकारशक्ती वाढवा!

1. पांढऱ्या रंगाची वस्तू

पांढरा रंग हा चंद्राशी संदर्भात असतो. अशात तुम्ही जर पांढऱ्या रंगाची वस्तू अर्थात चांदी, साखर, पांढरे कापड, कणीक किंवा इतर वस्तु दान केल्या किंवा दुसऱ्याला दिल्या तर त्याचा परिणाम थेट तुमच्या किर्तीवर होईल.

Astro Tips About Saturday
Healthy Lifestyle: खायच्या पानामध्ये चुना का लावतात?

2. पिवळ्या रंगाची वस्तू

पिवळा रंग हा गुरुशी संदर्भात असतो. अशात जर तुम्ही पिवळ्या रंगाची वस्तू म्हणजेच, हळद, पितळ, पिवळ कापड किंवा इतर वस्तु दान केल्या किंवा दुसऱ्याला दिल्या तर त्याचा परिणाम थेट सौख्यावर होईल.

Astro Tips About Saturday
Health Care : ब्राह्ममुहुर्तावर उठा, ताजेतवाने व्हा! मानसिक संतुलन, बुद्धीच्या संरक्षणासाठी ठरते फायदेशीर

3. लाल रंगाची वस्तू

लाल रंग हा सूर्याशी संदर्भात असतो. त्यामुळे आपल्याकडच्या लाल रंगाच्या गोष्टी जसं की कुंकू, तिखट, लाल कापड, मसूर डाळ या गोष्टी आपण दान केल्या किंवा दुसऱ्याला दिल्या तर त्याचा परिणाम थेट आपल्या गृह सुख्यावर होतो.

Astro Tips About Saturday
Christmas Holiday : नाताळमुळे शाळांना सुट्या; चिमुकल्यांत उत्साह

Disclaimer : सदर लेख हा फक्त सामान्य माहितीसाठी आहे आणि सकाळ माध्यम अशा कोणत्याही गोष्टीची पुष्टी करत नाही, या गोष्टी पाळण्याआधी ज्योतिष तज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com