Astrologer Siddheshwar Maratkar warns of aviation disasters : उत्तर भारतात अतिवृष्टीबरोबर भूस्खलन, हेलिकॉप्टर, विमान अपघात यांमधून मोठी हानी होण्याची शक्यता आहे. तसेच हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर यांसह उत्तर भारतात मोठी दुर्घटना संभवते, असं भाकित ज्योतिषाचार्य सिद्धेश्वर मारटकर यांनी वर्तवलं आहे. याशिवाय जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांवर या ग्रहयोगाचा परिणाम होणार असून, या काळात अतिवृष्टी, पूर, प्रलय, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमधून मोठी हानी होण्याची शक्यता राहील, असंही त्यांनी सांगितलं.