Bail Pola : यंदाच्या पोळ्याला आहे विशेष महत्व, जाणून घ्या तिथी आणि महत्व

शेतीसाठी उपयोगी पडणाऱ्या बैलाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वर्षातून एकदा बैल पोळ्याला त्यांची पूजा केली जाते. या सणाचे महत्व, मुहूर्त आणि बैलांना कसे सजवले जाते हे सविस्तर जाणून घेऊया.
Bail Pola
Bail Polaesakal

वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांचा एकमेव सण अर्थात पोळा दर वर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु, कोरोना नंतर आता दोन वर्षानंतर सर्व सण उत्सव उत्साहात साजरे केले जात आहेत. श्रावणातील प्रत्येक व्रत-वैकल्ये, सण-उत्सव यांना धार्मिक महत्त्व आहे, शेतकऱ्यांचा सखा, सोबती, प्रत्येक सुख दुःखात सहभागी असणारा, धन्यासाठी वर्षभर राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण साजरा केला जातो. श्रावण अमावास्येला पोळा साजरा करण्याची पद्धत महाराष्ट्रात आहे.

Bail Pola
राळेरासमध्ये साजरा झाला अनोखा 'ट्रॅक्टर पोळा'!

यंदा २७ ऑगस्टला महाराष्ट्रात हा सण साजरा केला जात आहे. श्रावणी अमावास्येच्या दिवशी शेतकरीवर्ग पोळा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतो. प्रदेशपरत्वे हा सण आषाढ महिन्यात मूळ नक्षत्र असलेल्या दिवशी किंवा श्रावण अथवा भाद्रपद महिन्याच्या अमावास्येला साजरा करतात. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये हा सण साजरा केला जातो. मात्र, परंपरा आणि मान्यतांनुसार, तिथी आणि वेळा भिन्न असतात. या सणाचे शेतकरीवर्गात विशेष महत्त्व आहे. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात दर्श अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात पोळा सण साजरा केला जातो.

Bail Pola
तान्हा पोळा; नागपुरात कसा साजरा होतो हे पहा फोटोंमध्ये

पोळा सणाचा नैवेद्य

पोळा सणाच्या आदल्या दिवशी बैलांना आवतण देण्यात येते. ओढा वा नदीवर नेऊन त्यांना आंघोळ घालतात. या दिवशी बैलाच्या खांद्याला हळद व तुपाने शेकतात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात. गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य दाखवतात.

Bail Pola
सण आयलाय गो... नारळी पुनवेचा

बैलांचा साजशृंगार

आपापल्या ऐपतीप्रमाणे शेतकरी बैलांचा साजशृंगार करतात. बैल सजवितात व मिरवणुकीत भाग घेतात. या दिवशी महाराष्ट्रातील खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते. गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनई, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. जून्या काळात ही बैलांची मिरवणूक घरोघरी जात असे व तिथल्या महिला त्यांची पूजा करून त्यांना पूरण पोळीचा नैवेद्य खाऊ घालतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com