Bhaubeej 2022 : यंदाच्या भाऊबीजेला केवळ २ तासाचा शुभ मुहूर्त; जाणून घ्या लाडक्या भावाचे कधी करायचे औक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhaubeej Diwali 2022

Bhaubeej 2022 : यंदाच्या भाऊबीजेला केवळ २ तासाचा शुभ मुहूर्त; जाणून घ्या लाडक्या भावाचे कधी करायचे औक्षण

पूणे : रक्षाबंधन प्रमाणेच भाऊबीज हा देखील भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा सण आहे. दिवाळीच्या दोन दिवसांनी भाऊबीज साजरी करण्याची प्रथा जुनी आहे. हा सण कार्तिक शुद्ध द्वितीया (यमद्वितीया) दिवशी असतो. हा दिवाळीतला तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी येतो.

हेही वाचा: Bhaubeej Diwali 2022 : यंदा कधी आहे भाऊबीज?

यावर्षीच्या दिवाळीत भाऊबीज आणि पाडवा एकत्र आला आहे. भाऊबीज ही भावा-बहिणीच्या तर पाडवा पती पत्नीच्या नात्याचा गोडवा वाढवणारे सण आहेत. या दिवशी भावाला औक्षण करून देवाकडे त्याच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते. त्याबदल्यात बहिणींना हवे असलेले गिफ्ट भावाकडून उकळले जाते.

हेही वाचा: Bhaubeej : असा वाढेल भावा-बहिणीच्या नात्यातील गोडवा

धार्मिक मान्यतेनुसार यमराज आणि त्यांची बहीण यमुना यांच्यामुळे हा सण साजरा केला जाऊ लागला. या दिवशी यमराजाने आपली बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्रे अलंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले म्हणून या दिवसाला यमद्वितीया म्हणतात. या दिवशी भावाला घरी बोलावून त्याचे औक्षण करण्याची परंपरा आहे.

हेही वाचा: Diwali Bhaubeej 2020 : आज पाडवा, भाऊबीज एकाच दिवशी साजरी होणार

भाऊबीजचा शूभ मुहूर्त

यावर्षी भाऊबीज उद्या म्हणजे २६ ऑक्टोवर रोजी आहे. या दिवशी भावाला ओवाळण्याचा शूभ मुहूर्त केवळ 2 तास 14 मिनिटांचा आहे. शुभ मुहूर्त दुपारी 1 वाजून 12 मिनीटांपासून ते दुपारी 3 वाजून 27 मिनीटांपर्यंत असेल.

हेही वाचा: Diwali Bhaubeej 2020 : भाऊबीजेला भावाला खास गिफ्ट्स द्याच

भाऊबीजची साजरी करण्याची पद्धतही रक्षाबंधन सारखीच आहे. या दिवशी बहिण आपल्या भावासाठी जेवण बनवते. भावाला ओवाळतात. देवाने आपल्या भावाला प्रत्येक संकटातून वाचवावे, अशी प्रार्थनाही करतात.