Bhondala : भोंडल्याची 'ही' ५ गाणी माहिती आहेत का?

लोकगीते काळाच्या ओघात लुप्त होत चालली आहेत, जाणून घेऊया भोंडल्याची ५ गाणी
Bhondala
Bhondalaesakal

Bhondala Folk Songs : महाराष्ट्रात नवरात्रीच्या काळात भोंडला खेळला जाण्याची जूनी परंपरा आहे. पण आजच्या पिढीला त्याविषयी फारसे काही माहित नाही. भोंडला, भुलाई , हादगा अशा वेगवेगळ्या नावांनी हा सण ओळखला जातो. पूर्वी अविवाहित मुलिंचा हा आवडता सण असे. त्यांना थोरल्या बहिणी, आई, आजी ही गाणी शिकवत असे. पण हल्ली कोणालाच वेळ नसल्याने नवीन पिढीला या परंपराही माहित नाही. मग गाणी माहित असण्याचा प्रश्न नाही.

Bhondala
सर्जनोत्सव - भुलाबाई , भोंडला, हादगा

ही लोकगीते काळाच्या ओघात लुप्त होत चालली आहेत, घरातल्या मोठ्या व्यक्ती , आजी यांना ती सारी लोकगीते अगदी तोंडपाठ होती, परंतु त्याची कुठेही नोंद न घेतल्याने संस्कृती, गाणी सारे काही विरून जाते आहे. अशाच काही गाण्यांची यादी इथे देत आहोत.

Bhondala
तळ कोकणातील लोककला ‘बाल्या नाचा’ला उभारी

* ऐलमा पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडून दे, करीन तुझी सेवा

माझा खेळ मांडिला वेशीच्या दारी, पारवं घुमतय पारावरी

गोदावरी काठच्या उमाजी नायका, आमच्या गावच्या भुलोजी बायका

एविनी गा तेविनी गा

आमच्या आया तुमच्या आया, खातील काय दुधोंडे

दुधोंडयाची लागली टाळी , आयुष्य दे रे भामाळी

माळी गेला शेता भाता, पाऊस पडला येता जाता

पड पड पावसा थेंबोथेंबी, थेंबोथेंबी आडव्या लोंबी,

आडव्या लोंबती अंगणा

Bhondala
शाहिरीसारखी लोककला जपली पाहिजे ः रासगे

अंगणा तुझी सात वर्षे, भोंडल्या तुझी सोळा वर्षे

अतुल्या मतुल्या चरणी चातुल्या,

चरणी चारचोडे, हातपाय खणखणीत गोडे

एकेक गोडा विसाविसाचा, साड्या डांगर नेसायच्या

नेसा गं नेसा बाहुल्यांनो, अडीच वर्षे पावल्यांनो

Bhondala
उत्तूरला रविवारी लोककला महोत्सव

* श्रीकांता कमलाकांता असं कसं झालं.

असं कसं वेडं माझ्या नशिबी आलं

वेडयाच्या बायकोने केले होते लाडू

तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले

चेंडू चेंडू म्हणून त्याने खेळायला घेतले

वेडयाच्या बायकोने केला होता चिवडा

तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले

केरकचरा म्हणून त्याने बाहेर फेकला

वेडयाच्या बायकोने केल्या होत्या करंज्या

तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले

होड्या होड्या म्हणून त्याने पाण्यात सोडल्या

Bhondala
सरकारी योजनांची गावोगावी लोककला पथकांकडून जागृती

वेडयाच्या बायकोने केल्या होत्या चकल्या

तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले

बांगडया बांगड्या म्हणून त्याने हातात घातल्या

वेड्याच्या बायकोने केले होते श्रीखंड

तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले

क्रीम क्रीम म्हणून त्याने तोंडाला फासले

वेड्याच्या बायकोने केल्या होत्या शेवया

तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले

गांडूळ गांडूळ म्हणून त्याने फेकून दिल्या.

वेड्याची बायको झोपली होती

तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले

मेली मेली म्हणून त्याने जाळून टाकले

Bhondala
कोकणातील पारंपारिक लोककला...

* नणंदा भावजया दोघी जणी

घरात नव्हतं तिसरं कोणी

शिंक्यावरचं लोणी खाल्लं कोणी

मी नाही खाल्लं वहिनीनी खाल्लं

आता माझा दादा येईल गं

दादाच्या मांडावर बसेन गं

दादा तुझी बायको चोरटी

असेल माझी गोरटी

घे काठी घाल पाठी

घराघराची लक्ष्मी मोठी

* कृष्णा घालितो लोळण, आली यशोदा धावून || धृ ||

काय रे मागतोस बाळा, तुला देते मी आणून

आई मला चंद्र दे आणून, त्याचा चेंडू दे करून

असलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं

कृष्णा घालितो लोळण, आली यशोदा धावून...||१||

आई मला विंचू दे आणून त्याची अंगठी दे करून

असलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं

कृष्णा घालितो लोळण, आली यशोदा धावून....||२||

आई मला साप दे आणून त्याचा चाबूक दे करून

असलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं

कृष्णा घालितो लोळण, आली यशोदा धावून...||३||

एक लिंबू झेलू बाई दोन लिंबं झेलू

दोन लिंबं झेलू बाई तीन लिंबं झेलू

तीन लिंबं झेलू बाई चार लिंबं झेलू

चार लिंबं झेलू बाई पाच लिंबं झेलू

पाचा लिंबांचा पाणोठा

माळ घाली हनुमंताला

हनुमंताची निळी घोडी

येता जाता कमळं तोडी

कमळाच्या पाठीमागे लपली राणी

अगं अगं राणी इथे कुठे पाणी

पाणी नव्हे यमुना जमुना

यमुना जमुनाची बारिक वाळू

तेथे खेळे चिल्लारी बाळू

चिल्लारी बाळाला भूक लागली

सोन्याच्या शिंपीने दूध पाजले

पाटावरच्या गादीवर निजविले

निज रे निज रे चिल्लारी बाळा

मी तर जाते सोनार वाडा

सोनार दादा सोनार दादा

गौरीचे मोती झाले की नाही

गौरीच्या घरी तांब्याच्या चुली

भोजन घातले आवळीखाली

उष्टया पत्रावळी चिंचेखाली

पान सुपारी उद्या दुपारी..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com