Mercury Transit Money Luck: बुधाचा पुनर्वसू नक्षत्रात प्रवेश! 'या' ३ राशींच्या नशिबात आर्थिक सुबत्ता, तुमची रास यामध्ये आहे का?

June 2025 Mercury Transit Astrology Predictions: बुधाच्या नक्षत्र बदलामुळे ३ राशींना आर्थिक लाभ होणार आहे – पाहा तुमची राशी यामध्ये आहे का!
Mercury Transit Lucky Zodiac Signs
Mercury Transit Lucky Zodiac Signssakal
Updated on

Which Zodiac Signs will Get Money as Mercury Enters Punarvasu: १६ जून रोजी बुध ग्रहाने आर्द्रा नक्षत्रातून बाहेर पडून पुनर्वसू नक्षत्रात प्रवेश केला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, पुनर्वसू नक्षत्राचे स्वामी देवगुरु बृहस्पती आहेत. बुधाचा हा नक्षत्र बदल सर्व १२ राशींवर काही ना काही प्रभाव टाकणार आहे. मात्र, काही राशींसाठी हे परिवर्तन विशेष फलदायी ठरणार आहे. या कोणत्या तीन राशी आहेत ते आपण पाहूया.

मिथुन

या राशीच्या व्यक्तींच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे. नोकरीत प्रगतीचे मार्ग खुले होतील. एखादी आनंददायक बातमी मिळण्याची शक्यता आहे. पैतृक संपत्तीशी संबंधित प्रकरणांमध्ये फायदा होऊ शकतो. करिअरमधील अडथळे दूर होतील आणि कुटुंबातील मतभेद कमी होतील. नवीन नोकरीच्या संधी देखील उपलब्ध होतील.

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी ही वेळ आर्थिकदृष्ट्या लाभदायक ठरणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. आरोग्याशी संबंधित समस्या कमी होतील. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तर हे परिवर्तन फायद्याचे ठरेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून कौतुक होईल.

धनू

धनू राशीच्या जातकांसाठी बुधाचे पुनर्वसू नक्षत्रातील आगमन शुभ फलदायी ठरणार आहे. वैवाहिक जीवनातील तणाव कमी होईल. व्यावसायिक जीवन उत्तम चालेल. आर्थिक स्थिती बळकट होईल. सध्याचा काळ गुंतवणुकीसाठी लाभदायक आहे. तसेच कुटुंबीयांचा पाठिंबाही लाभेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com