Shahrukh Khan Astrology : शाहरुखवर पुन्हा संकटाचे सावट ; ज्योतिषी म्हणतात, काळ चांगला नाही... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shahrukh Khan Astrology

Shahrukh Khan Astrology : शाहरुखवर पुन्हा संकटाचे सावट ; ज्योतिषी म्हणतात, काळ चांगला नाही...

Shahrukh Khan Astrology : यंदाची संक्रात काही लोकांसाठी चांगली तर काही लोकांसाठी वाईट असणार आहे. ही संक्रांती ज्या दिशेकडून येते त्या दिशेकडील लोकांना सुख प्राप्त होते व ज्या दिशेकडे जाते त्या दिशेकडील लोकांना दुःख व क्लेश होतात.

अशातच बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खान सध्या पठाण चित्रपटावरुन चर्चेच आहे. शाहरुखविषयी ज्योतिषींनी काय सांगितले, याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. (Shahrukh Khan Astrology makar sankranti 2023 astrologist)

ज्योतिषी म्हणाले, शाहरुख खानची रास ही कुंभ आहे आणि कुंभ राशीसाठी यंदाची संक्रांत क्लेषदायक असणार आहे. कुंभ राशीसाठी हा काळ वाईट आणि नुकसानीचा काळ असणार असून जनमानसात प्रतिमा वाईट होणार आहे. ज्याची प्रचिती आपल्याला पठाण चित्रपटाच्या वादावरुन आली.

डॉ. नरेंद्र धारणे, ज्योतिष वाचस्पती

हेही वाचा: Anil Deshmukh Astrology : अनिल देशमुखांच्या राशीवर संक्रातीची कृपा ज्योतिषी म्हणतात, सुवर्णकाळ...

शाहरुख खानच्या आगामी चित्रपटावरुन देशभरात वादंग उठलाय. चित्रपटातील बेशरम गाण्यावरुनही बरीच टिका झाली. एवढंच काय तर भगवी बिकनीचा वाद ही रंगला. यात शाहरुखवर कडाडून टिका करण्यात आली. शाहरुखचे पोस्टरही काही ठिकाणी जाळण्यात आले होते. चित्रपट रिलिज झाल्यानंतर आणखी किती टिका होणार, यावरही आता सर्वांचे लक्ष आहे.