Budh-Aditya Yoga July 2025: बुध-सूर्य युतीने बनणार ‘बुधादित्य योग’; 'या' ३ राशींसाठी जुलै ठरणार 'गोल्डन मंथ'! तुमच्या राशीला काय लाभ होणार?

Monthly Rashibhavishya July 2025: जुलै २०२५ मध्ये तयार होणाऱ्या बुधादित्य योगामुळे मिथुन, कर्क आणि सिंह राशींना नशिबाची साथ लाभणार आहे.
Monthly horoscope for all zodiac signs in July 2025
Monthly horoscope for all zodiac signs in July 2025sakal
Updated on

Which Zodiac Signs are Lucky in July 2025 Astrology: आजपासून जुलै महिना सुरु झाला असून ज्योतिषशास्त्रानुसार या महिन्यात गुरू ग्रह मिथुन राशीत उदय करून, शनि मीन राशीत वक्री होऊन, आणि सूर्य-बुध कर्क राशीत येऊन बुधादित्य योग तयार करतील. हेच योग काही राशींसाठी फारच लाभदायक ठरणार आहेत. जाणून घ्या तुमच्यासाठी जुलै कसा राहील...

मेष

महिन्याची सुरुवात काहीशी आव्हानात्मक होईल. कामात अडथळे येतील, मानसिक अस्वस्थता जाणवेल. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. शत्रू आणि फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहा. आरोग्याच्या दृष्टीने पोटाचे त्रास संभवतात. मात्र, महिन्याच्या उत्तरार्धात परिस्थिती सुधारेल. कुटुंबाकडून साथ मिळेल आणि वैवाहिक जीवनात सौहार्द निर्माण होईल.

वृषभ

करिअरमध्ये प्रगतीचे संकेत असून, प्रमोशन किंवा जुने थकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. मात्र कामाचा ताण वाढेल, त्यामुळे विश्रांती घ्या. व्यापारात व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. प्रेमसंबंध चांगले राहतील. मुलांच्या बाबतीत थोडी चिंता निर्माण होऊ शकते. विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रीत ठेवावे लागेल.

मिथुन

महिना लाभदायक राहील. आर्थिक स्थैर्य मिळेल, विविध स्त्रोतांमधून पैसा येण्याची शक्यता आहे. जुने अडथळे दूर होतील. पण महत्त्वाचे निर्णय घाईगडबडीत घेऊ नका. कामाच्या पद्धतीत सुधारणा करा. वैवाहिक जीवन समाधानकारक राहील. प्रेमात सुसंवाद वाढेल. काही विरोधक त्रास देण्याचा प्रयत्न करतील, पण यश तुमचंच राहील.

कर्क

महिन्याची सुरुवात शुभ योग घेऊन येते. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुलतील. ट्रान्सफर किंवा प्रमोशनची शक्यता आहे. पण अनपेक्षित प्रवासाच्या वेळी संवादात संयम ठेवा. मातृआरोग्याची काळजी घ्या. प्रेमसंबंध सुधारतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

सिंह

नशिबाची साथ मिळेल. परदेशी संधी मिळू शकतात. घरात खर्च वाढेल. वाहनखरेदी किंवा धार्मिक कार्यक्रमाची योजना होऊ शकते. घर-जमिनीचे व्यवहार महिन्याच्या उत्तरार्धात यशस्वी होतील. प्रेमात समजूतदारपणाने वागा. आरोग्यावर लक्ष द्या.

कन्या

महिना काहीसे चढ-उतार घेऊन येईल. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांशी मतभेद टाळा. दुसऱ्याच्या सांगण्यावरून निर्णय घेणे टाळा. कला-क्रिएटिव्ह क्षेत्रातील व्यक्तींनी संधीचे सोनं करावं. वैवाहिक जीवनात शांततेने प्रश्न सोडवा. ध्यान-योगाच्या सवयींनी मनःशांती मिळेल.

तूळ

महिन्याची सुरुवात सावधतेची आहे. गुप्त शत्रू त्रास देऊ शकतात. गोष्टी गुप्त ठेवा. आत्मविश्वास कमी होऊ शकतो. प्रेमसंबंधात गैरसमज निर्माण होऊ शकतो. पण तिसऱ्या आठवड्यापासून सुधारणा दिसेल. मोठ्या निर्णयांसाठी थोडी वाट बघा.

वृश्चिक

आळस टाळा, नाहीतर संधी गमवाल. व्यावसायिक अडथळे येतील पण प्रयत्नांनी मार्ग निघेल. घरातील वाद टाळा. मध्यात सकारात्मक बदल दिसतील. उत्पन्नाचे नवीन मार्ग मिळतील. प्रेमसंबंध विवाहात रूपांतर होऊ शकतात.

धनु

सुरुवात थोडी तणावपूर्ण असेल. कौटुंबिक मतभेद आणि मानसिक थकवा संभवतो. कामात प्रामाणिकपणाने यश मिळेल. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. प्रेमसंबंधात सतर्क राहा. जीवनसाथीशी सौहार्द टिकवून ठेवा. घरातील वडिलधाऱ्यांची मदत फायदेशीर ठरेल.

मकर

सुरुवात कठीण, शेवट समाधानकारक. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. ऑफिसमधील संवाद जपून करा. वैवाहिक जीवनात अहंकार टाळा. कागदपत्र तपासून साइन करा. महिन्याच्या शेवटी करिअरमध्ये चांगले बदल होतील. वडिलांच्या तब्येतीकडे लक्ष द्या.

कुंभ

या महिन्याची सुरुवात अनुकूल, नंतर मेहनत वाढेल. जुने काम पूर्ण होतील. नवीन ओळखी करिअरमध्ये उपयोगी ठरतील. खर्च वाढेल. बोलताना संयम ठेवा. प्रेमसंबंधात तणाव संभवतो. जीवनसाथीची तब्येत चिंतेची ठरू शकते. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष नको.

मीन

या राशीच्या लोकांसाठी हा संतुलित महिना असेल. कामात यश मिळेल. मानसिक समाधान मिळेल. धार्मिक प्रवासाचे योग मिळतील. निर्णय घेताना विश्वास ठेवून चालू नका. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. प्रेमात भावना ओलांडू नयेत. वैवाहिक जीवन गोड राहील. प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com