Panchang 16th sept: पांढरे वस्त्र परिधान करणे आज शुभ ठरेल

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:४२ ते दु.०३:१९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
Aajache Panchang | Daily Panchang in Marathi
Aajache Panchang | Daily Panchang in Marathisakal

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १६ सप्टेंबर २०२२ (daily panchang 16 september 2022 )

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक भाद्रपद २४ शके १९४४

आज सूर्योदय ०६:२५ वाजता तर सुर्यास्त १८:३३ वाजता होणार. आज चंद्रोदय हा २२:५२ वाजता तर प्रात: संध्या ही स.०५:१४ ते स.०६:२५ दरम्यान होणार. आज सायं संध्या ही १८:३३ ते १९:४४ दरम्यान होणार तर आज अपराण्हकाळ हा १३:४३ ते १६:०८ दरम्यान असणार. आज प्रदोषकाळ हा १८:३३ ते २०:५५ दरम्यान असणार तर निशीथ काळ हा २४:०७ ते २४:५३ दरम्यान असणार.आज राहु काळ हा १०:५८ ते १२:२९ दरम्यान आहे तर यमघंट काळ हा १५:३१ ते १७:०२ दरम्यान आहे.

आज श्राद्धतिथी ही  सप्तमी श्राद्ध आहे. सर्व कामांसाठी दु.०१:२४ प. शुभ दिवस आहे. कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:४२ ते दु.०३:१९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. विशेष म्हणजे या दिवशी तेल खावू नये. या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

Aajache Panchang | Daily Panchang in Marathi
Panchang 14th sept: या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे

लाभदायक

  • लाभ मुहूर्त - ०७:५७ ते ०९:२८

  • अमृत मुहूर्त -  ०९:२८ ते १०:५८

  • विजय मुहूर्त - १४:३२ ते १५:२०

पृथ्वीवर अग्निवास १३:२४ प. गुरू मुखात आहुती आहे. शिववास भोजनात , काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - दक्षिणायन

  • ऋतु - वर्षा(सौर)

  • मास - भाद्रपद

  • पक्ष - कृष्ण

  • तिथी - षष्ठी(१३:२४ प.नं. सप्तमी)

  • वार - शुक्रवार

  • नक्षत्र - कृत्तिका(१२:०९ प.नं.रोहिणी)

  • योग - हर्षण(०८:४२ प.नं.वज्र)

  • करण - वणिज(१३:२४ प.नं. भद्रा)

  • चंद्र रास - वृषभ

  • सूर्य रास - सिंह

  • गुरु रास - मीन

Aajache Panchang | Daily Panchang in Marathi
Horoscope 14 sept: आजचे राशी भविष्य; जाणून घ्या तुमची रास

विशेष:- भद्रा १३:२४ ते २६:०३, *सप्तमी श्राद्ध, ज्ञानेश्वरी ग्रंथ जयंती, रवियोग-यमघंट १२:०९ नं.

या दिवशी पाण्यात कापूर चूर्ण टाकून स्नान करावे. देवी अर्गला स्तोत्राचे पठण करावे. ‘शुं शुक्राय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा. देवीला दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा. सत्पात्री व्यक्तीस साखर दान करावी.

दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना सातू खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक, धनु, मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com