

Why Do People Keep a Flour Lamp in the South Direction on Deep Amavasya? |Tradition and Significance Explained
sakal
Why Keep Wheat Flour Diya on Deep Amavasya: श्रावण सुरु होण्याच्या आदल्या दिवशी घरात एक लगबग सुरु असते, ती म्हणजे दीप अमावस्येची. या दिवशी महाराष्ट्रातल्या अनेक घरांमध्ये घरातले दिवे स्वच्छ करून, त्यांच्याभोवती रांगोळी काढून पूजा करण्याचं चित्र पाहायला मिळतं.
या दिव्यांसोबतच घरात कणकेचा दिव बनवून तो खास दक्षिण दिशेला ठेवण्याची प्रथा आहे. पण विशेष याच दिशेला दिवा का ठेवला जातो, त्यांचा आपल्या पितरांशी काही संबंध आहे का, असे प्रश्न बऱ्याचजणांना पडतात. तुम्हालाही हे प्रश्न पडत असतील, तर या परंपरेमागची श्रद्धा, त्याचे महत्त्व आणि चवीला खास लागणाऱ्या कणकेच्या दिव्यांची सोपी कृती जाणून घ्या.