देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्रिपद का हुकले? ज्योतिषतज्ज्ञांनी केला धक्कादायक दावा

देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार हे सर्वांनीच गृहीत धरले होते.
Devendra Fadnavis bjp Astrology |Bhavishya Patrika Prediction
Devendra Fadnavis bjp Astrology |Bhavishya Patrika Predictionsakal

गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेसाठी प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. या सर्वांवर निकाल लावत गुरूवारी राज्यपालांकडून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून व देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होणार आहेत असे सांगितल्यावर सर्वांनाच फार मोठा धक्का बसला, कारण देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार हे सर्वांनीच गृहीत धरले होते. देवेंद्र फडणवीस व त्यांचे सहकारी, कार्यकर्ते हे गेली कित्येक महिने मुंबई महानगरपालिका जिंकायची या दृष्टीने प्रयत्नशिल होते. तसेच महाराष्ट्रातसुद्धा पुढील निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता मिळवायची याबद्दलचा निर्धार त्यांनी व्यक्त केला होता.

मुंबईची महानगरपालिका व आगामी महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक ही जिंकायचीच हा त्यांचा निर्धार होता व त्यासाठी ते प्रचंड श्रम घेत होते. परवाच्या राज्यसभा निवडणुकीत अगोदर सांगून खात्रीपूर्वक केलेली विधाने त्यांनी सार्थ करून दाखवली. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांचा तसेच महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचा देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलचा आदर दुणावला होता.

या अगोदरच्या मागील निवडणुकीत त्यांचे मुख्यमंत्रिपद हुकले होते व आताही एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना व अपक्ष असे ५० च्या आसपास संख्याबळ असताना त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद गेले हा एक फार मोठा धक्का सर्वांनाच होता. हे सर्व नाट्य का घडले हे ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहूया.

श्री. देवेंद्र फडणवीस (२२-०७-१९७०) नागपूर (राशी कुंडली)

देवेंद्र फडणवीस यांना दि. २४/०१/२०२० पासूनच साडेसाती सुरू झाली आहे. आता ते मुख्यमंत्री होणार अशा पद्धतीचे सर्वांनी भाकीत केले होते. साडेसातीमुळे एक पायरी खाली यावे लागले. गुरूने त्यांना अधिकार दिला परंतु साडेसातीमुळे पूर्ण अधिकार लाभला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com